)
Ravindra Jadeja Sister : भारताचा स्टार ऑल राउंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) टेस्ट सीरिजमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. मँचेस्टरमध्ये झालेल्या टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दिवशी त्याने भारतासाठी फलंदाजी करताना शतक सुद्धा ठोकलं. अशातच आता जडेजाची बहीण नैना हिने रवींद्र जडेजाला एक सन्मान देण्यात यावा अशी मागणी सरकारकडे केलीये.
इंग्लंड दौऱ्यात रवींद्र जडेजाने जबरदस्त परफॉर्मन्स दिला. यानंतर जडेजाची बहीण नैना हिने माजी क्रिकेटर अजय जडेजाने रवींद्र जडेजाची केलेली मागणी पुन्हा केली. जिथे त्याने जामनगरच्या 'सात रस्ता' चं नाव ऑलराउंडर रवींद्र जडेजाच्या नावावर ठेवलं जावं अशी मागणी केली होती. रवींद्र जडेजाने इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या टेस्टमध्ये 454 धावा केल्या तसेच 7 विकेट सुद्धा मिळवले. जडेजाची बहीण भाऊ रवींद्रच्या या कामगिरीने खुश झालीये.
रवींद्र जडेजाची बहीण नैना म्हणाली की, 'आम्हाला त्याच्यावर गर्व आहे. आम्ही खुश आहोत की रवींद्र जडेजा हा भारतासाठी उत्तम परफॉर्म करतोय'. पुढे नैना म्हणाली की, 'माजी क्रिकेटर अजय जडेजाने म्हटले की, जामनगरच्या 'सात रस्ता' चं नाव बदलून रवींद्र जडेजा ठेवावं. ते आमचे युवराज आहेत. हे आमच्यासाठी खरंच खूप गर्वाची गोष्ट आहे. मी आशा करते की यावर जामनगर महानगरपालिका लक्ष देईल. जामनगरमधून अनेक क्रिकेटर्स निघाले आहेत. त्यांना उच्च सन्मान मिळायला हवा. त्यामुळे महानगरपालिकेला पुन्हा एकदा विचार करायला हवा.
नैना जडेजाने माजी क्रिकेटर अजय जडेजाचे आभार मानले. ते म्हणाले की, 'मी आशा करते की जामनगर महापालिका या मागणीकडे लक्ष देईल. गुजरात सरकार आणि जामनगर महानगरपालिकेने ज्याकडे लक्ष दिले नाही त्याकडे लक्ष दिल्याबद्दल मी अजय जडेजाचे आभार मानू इच्छिते'.
रवींद्र जडेजाने आतापर्यंत भारताकडून 85 टेस्ट, 204 वनडे तर 74 टी 20 सामने खेळले आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने 3824 धावा केल्या असून वनडेमध्ये त्याने 2806 धावा केल्या आहेत. तर टी 20 सामन्यात 515 धावा केल्या आहेत.