Gujarat Cabinet Expansion: 'या' क्रिकेटपटूची पत्नी गुजरात सरकारमध्ये होणार मंत्री! जाणून घ्या Net Worth

Gujarat Cabinet Expansion: एका प्रसिद्ध क्रिकेटपटूंच्या पत्नी लवकरच गुजरात सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेणार असून त्यानिमिताने जाणून घ्या त्यांची नेट वर्थ.   

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 17, 2025, 01:22 PM IST
Gujarat Cabinet Expansion: 'या' क्रिकेटपटूची पत्नी गुजरात सरकारमध्ये होणार मंत्री! जाणून घ्या Net Worth

Ravindra Jadeja’s Wife Rivaba Jadeja : गुजरातमध्ये आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या आधी 16 मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला असून, नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. सुमारे 25 नवे चेहरे या नव्या कॅबिनेटमध्ये दिसू शकतात. या नव्या यादीत भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजा यांच्या पत्नी आणि जामनगर उत्तर मतदारसंघाच्या आमदार रिवाबा जडेजा यांचे नावही चर्चेत आहे. महिला आणि युवा नेते म्हणून त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Add Zee News as a Preferred Source

राजकीय करिअरमधील प्रगती

रिवाबा जडेजा या भारतीय जनता पक्षाच्या आमदार असून, त्या जामनगर उत्तर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. आमदार म्हणून त्यांना मानधनासोबत विविध भत्ते मिळतात. आता जर त्यांना कॅबिनेटमध्ये मंत्रीपद मिळाले, तर त्यांच्या अधिकृत उत्पन्नात आणखी वाढ होईल.

कौटुंबिक व्यवसायातून कमाई

राजकारणाशिवाय रिवाबा आपल्या कौटुंबिक व्यवसायातही सक्रिय आहेत. जामनगरमधील प्रसिद्ध “जड्डूज फूड फील्ड” या रेस्टॉरंटमध्ये त्यांचा 50 टक्के हिस्सा आहे. हा व्यवसाय त्यांच्या नियमित उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे आणि त्यांची उद्योजक वृत्तीही यातून दिसून येते. या माध्यमातून त्यांनी राजकीय करिअरपलीकडे स्वतःची आर्थिक ओळख मजबूत केली आहे.

संपत्ती आणि मालमत्ता

रिवाबा जडेजा यांची कमाई कौटुंबिक संपत्तीतूनही होते. त्यांच्या नावावर चल आणि अचल अशी अनेक मालमत्ता आहेत. 2022 च्या गुजरात निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या हलफनाम्यानुसार, त्यांची वार्षिक उत्पन्न 6.20 लाख रुपये आहे. त्यांच्याकडे ₹34.80 लाखांचे सोने, ₹14.80 लाखांचे हिरे आणि सुमारे ₹8 लाखांचे चांदीचे दागिने आहेत. तसेच पती रविंद्र जडेजा यांच्या कमाईमुळे आणि गुंतवणुकीमुळेही जडेजा कुटुंब आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत झाले आहे.

एकूण नेट वर्थ

रिवाबा जडेजा यांच्या वैयक्तिक संपत्तीची एकूण किंमत अंदाजे 12 ते 15 कोटी दरम्यान आहे. तर पती रविंद्र जडेजा यांच्या मालमत्तेसह जडेजा कुटुंबाची एकत्रित नेट वर्थ सुमारे 100 कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते.

 राजकारणात प्रवेश कसा झाला? 

रिवाबा मार्च 2019 मध्ये भाजपमध्ये दाखल झाल्या. त्याआधी त्या करणी सेना या राजपूत समाजाच्या महिला शाखेच्या प्रमुख होत्या. 2022 मध्ये त्यांनी जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली आणि 88,110 मतांनी विजय मिळवून आमदार झाल्या. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आहेत, कारण त्यांना गुजरात सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More