IPL 2026 : आयपीएल 2026 बाबत (IPL 2026) फॅन्समध्ये आता मोठी उत्सुकतता आहे. मागच्यावर्षी रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने स्पर्धेत उत्तम प्रदर्शन करून विजेतेपद पटकावले. या विजयानंतर पुढच्याच दिवशी आरसीबीने बंगळुरूमध्ये विक्ट्री परेड काढली. पण या विक्ट्री परेडमध्ये एम चिन्नस्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली आणि यात तब्बल 11 लोकांनी जीव गमावला.
चेंगराचेंगरी प्रकरणानंतर आरसीबी तसेच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच या प्रकरणानंतर चिन्नस्वामी स्टेडियमवर एकही सामना खेळवला गेला नाही. अद्याप एकाही सामन्याच्या आयोजनासाठी चिन्नस्वामी स्टेडियमला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला नाही. 2026 मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठीही या स्टेडियमची निवड झालेली नाही. आयपीएल 2026 मध्ये आरसीबी चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांचे होम ग्राऊंडवरील सामने खेळणार नाही अशी माहिती समोर आली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू त्यांचे सर्व होम सामने हे आयपीएल 2026 मध्ये पुण्यात खेळू शकतात. याचं कारण चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर झालेली चेंगराचेंगरी आहे. त्यानंतर अद्याप या ठिकाणी कोणताही सामना खेळवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. 4 जून 2025 रोजी स्टेडियमच्या बाहेरील परिसरात ही चेंगराचेंगरी झाली नव्हती.
एमसीएचे सचिव कमलेश पिसाळ यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, 'पुण्यात आरसीबी सामने आयोजित करण्याबाबत चर्चा सुरु आहे. परंतु ती अद्याप नक्की काही ठरलेले नाही. कर्नाटकमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे त्यांना अडचणी येत आहेत. म्हणून ते एक ठिकाण शोधत आहेत आणि आम्ही त्यांना आमचे स्टेडियम ऑफर केले होते. सुरुवातीच्या चर्चा झाल्या आहेत आणि काही तांत्रिक समस्या आहेत ज्या सोडवण्याची आवश्यकता आहे. जर सगळं काही ठीक असेल तर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशनचं स्टेडियम हे आयपीएल 2026 साठी आरसीबीचं नवं होम ग्राउंड असेल.
हेही वाचा : रोहित - कोहलीसाठी BCCI चं नवं फर्मान, अट मान्य केली नाही तर वर्ल्ड कपचं स्वप्न भंगणार
आरसीबीचे नवे होम ग्राउंड कुठे असू शकते?
आरसीबीचे नवे होम ग्राउंड पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशनचे स्टेडियम असू शकते.
आरसीबीचे नवे होम ग्राउंड पुण्यात असण्याचे कारण काय आहे?
आरसीबीचे नवे होम ग्राउंड पुण्यात असण्याचे कारण चिन्नस्वामी स्टेडियमवर एकही सामना खेळवला गेला नाही आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशनचे स्टेडियम उपलब्ध आहे.
चिन्नस्वामी स्टेडियमवर चेंगराचेंगरी कधी झाली?
चिन्नस्वामी स्टेडियमवर चेंगराचेंगरी 4 जून 2025 रोजी झाली.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 151/9
|
VS |
SIN
155/7(19.1 ov)
|
| Singapore beat Indonesia by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
IND
162(19.1 ov)
|
| South Africa beat India by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.