फक्त एका फोन कॉलवर....रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यावर जवळच्या मित्राने केला खुलासा

IND VS AUS : बीसीसीआयने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलीया वनडे आणि टी २० सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली. यात शुभमन गिलला भारताचा नवा वनडे कर्णधार बनवण्यात आलं.  ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यापासून रोहित शर्माला वनडे कर्णधार पदावरून का हटवलं याच्या चर्चा जोर धरू लागल्या.   

पूजा पवार | Updated: Oct 5, 2025, 03:31 PM IST
फक्त एका फोन कॉलवर....रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यावर जवळच्या मित्राने केला खुलासा
(Photo Credit : Social Media)

IND VS AUS : बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी 20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा शनिवारी केली आहे. वनडे आणि टी 20 फॉरमॅटमध्ये टीम इंडिया प्रत्येकी तीन सामने खेळणार आहे. सिलेक्शन कमिटीने वर्ल्ड कप 2027 लक्षात घेऊन शुभमन गिलला वनडे कर्णधार बनवलंय, त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सीरिजमध्ये तो भारतीय संघाचं नेतृत्व करेल. तर टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळताना दिसतील. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यापासून रोहित शर्माला वनडे कर्णधार पदावरून का हटवलं याच्या चर्चा जोर धरू लागल्या. 

Add Zee News as a Preferred Source

रोहित शर्माचा मित्र आणि माजी भारतीय क्रिकेटपटू अभिषेक नायरने (Abhishek Nair) म्हटले की, 'जर बीसीसीआय सिलेक्टर कमिटीने आणि उर्वरित व्यवस्थापनाने रोहित शर्माला त्यांच्या योजनेबद्दल माहिती दिली असती तर आणि जर रोहितलाही तेच हवे असेल तर वनडे कर्णधार बदलण्यास काही हरकत नाही. पण ही चर्चा फक्त फोन कॉलवर होऊ शकत नाही, सविस्तर चर्चा आवश्यक आहे'. 

बीसीसीआयच्या सिलेक्टर कमिटीने घेतलेल्या या निर्णयानंतर रोहित शर्माच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आल्यावर हे स्पष्ट आहे की जर रोहितला त्याच्या करिअरमधील शेवटचा वर्ल्ड कप 2027 खेळायचा असेल तर त्याला मैदानात आपल्या प्रदर्शनाने उत्तर द्यावं लागेल. अजित आगरकरांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, 'विराट आणि रोहित सध्या वर्ल्ड कप 2027 खेळण्यासाठी नॉन कमिटेड आहेत. मात्र रोहितचा जवळचा मित्र अभिषेक नायरने सांगितले की दोन्ही स्टार फलंदाजांची वर्ल्ड कपसाठीची तयारी पूर्ण झाली आहे.  

हेही वाचा : Rohit Sharma: ‘रोहित शर्मा युग संपलं’, ‘हिटमॅन’च्या एका पोस्टमुळे विश्व क्रिकेटमध्ये खळबळ!

 

अभिषेक नायरने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हटले की, 'कम्यूनिकेशनमध्ये वेळ लागतो. हे फक्त एका फोन कॉल पेक्षा खूप जास्त आहे. कर्णधार पदासंदर्भातील निर्णयामध्ये सर्व पक्षांनी सविस्तर चर्चा केली असेल आणि रोहितलाही त्यात समाविष्ट केले असेल अशी आशा अभिषेकने व्यक्त केली. अभिषेक नायर म्हणाला की, 'माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे. बघा, त्यांच्याशी ती चर्चा होईपर्यंत ते सर्व एकाच दिशेने विचार करत होते," नायर म्हणाला. जर रोहित शर्मा असं म्हणाला की, 'हो, आपल्याला पुढे पाहावे लागेल, आपल्याला शुभमन गिलला संधी द्यायची आहे आणि मी त्याला मदत करण्यासाठी त्या ड्रेसिंग रूममध्ये तुमच्यासोबत असेन.' तर मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे', तर ती खूप चांगली गोष्ट आहे.   

FAQ : 

वनडे सीरिजमध्ये शुभमन गिलला कर्णधार का बनवलं?
उत्तर: सिलेक्शन कमिटीने वर्ल्ड कप २०२७ लक्षात घेऊन शुभमन गिलला वनडे कर्णधार बनवलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सीरिजमध्ये तो भारतीय संघाचं नेतृत्व करेल.

रोहित शर्माला वनडे कर्णधार पदावरून का हटवलं?
उत्तर: रोहित शर्माला हटवण्याबाबत स्पष्ट कारण सांगितलं नाही, पण घोषणेनंतर चर्चा सुरू झाल्या आहेत. अभिषेक नायर यांनी म्हटलं की, जर बीसीसीआय आणि व्यवस्थापनाने रोहितला योजनेबद्दल माहिती दिली असती आणि रोहितलाही ते मान्य असेल तर बदल ठीक आहे. मात्र, ही चर्चा फक्त फोन कॉलवर होऊ शकत नाही; सविस्तर चर्चा आवश्यक आहे.

भारत - ऑस्ट्रेलिया सीरिजचा फॉरमॅट काय आहे?
उत्तर: वनडे आणि टी२० फॉरमॅटमध्ये टीम इंडिया प्रत्येकी तीन सामने खेळणार आहे.

 

 

About the Author