पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती 177530000000 रुपयांना खरेदी करणार RCB टीम; IPL मधील सर्वात मोठी डील

पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती RCB टीम खरेदी करणार आहे. 177530000000 रुपयांना हा व्यवहार होणार आहे. IPL मधील सर्वात मोठी डील असेल. 

वनिता कांबळे | Updated: Oct 12, 2025, 11:11 PM IST
पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती 177530000000 रुपयांना खरेदी करणार RCB टीम; IPL मधील सर्वात मोठी डील

Adar Poonawalla Buy RCB :  आयपीएल 2025 मध्ये असे काही घडणार आहे  जे या स्पर्धेच्या इतिहासात कधीच घडले नव्हते. 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आरसीबी संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकली. पण RCB टीम विकली जाणार आहे.  डियाजियोची उपकंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (यूएसएल) त्यांचा आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विकण्याची तयारी करत आहे. पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती  177530000000 रुपयांना RBC टीम खरेदी करणार आहे.

Add Zee News as a Preferred Source

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला हे या संघाला खरेदी करण्यासाठी आघाडीवर आहेत. पूनावाला हे पुण्यातील सरव्ता श्रीमंत व्यक्ती आहेत. यूएसएलला या फ्रँचायझीसाठी 2 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 17,762 कोटी रुपयांचे मूल्यांकन हवे आहे. यामुळे आरसीबी जगातील सर्वात महागडी टीम ठरणार आहे. आरसीबी हा डिएगोसाठी "नॉन-कोअर" व्यवसाय आहे, म्हणून ते ते विकू इच्छितात. या करारासाठी जागतिक गुंतवणूक बँक सिटीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएल 2025 मध्ये आरसीबीचा विजय आणि बेंगळुरूमधील दुःखद घटनेनंतर संघाच्या विक्रीच्या अफवा तीव्र झाल्या.

युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (USL) ही एक मोठी कंपनी आहे. ही लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या ब्रिटीश बहुराष्ट्रीय मद्य कंपनी डायजिओची उपकंपनी आहे. USL त्यांचा आयपीएल संघ, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विकू इच्छित आहे. इतक्या मोठ्या किंमतीमुळे RCB जगातील सर्वात मौल्यवान क्रीडा संघटनांपैकी एक होईल. विक्री प्रक्रिया हाताळण्यासाठी जागतिक गुंतवणूक बँक सिटीला सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सिटी हा करार पूर्ण करण्यास मदत करेल.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला हे या करारासाठी सर्वात प्रबळ दावेदार मानले जातात. डिएगो गेल्या काही काळापासून आरसीबीच्या विक्रीवर लक्ष ठेवून होते. आयपीएल 2025 मध्ये आरसीबीच्या विजयाच्या उत्सवादरम्यान संघाच्या विक्रीच्या अफवा वाढल्या. बेंगळुरूमध्ये उत्सवादरम्यान एक दुःखद चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. तेव्हापासून RCB टीम चर्चेत आहे.  अदार पूनावाला हे जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या कंपनीने कोविड-19 साथीच्या काळात कोविशिल्ड लस विकसित केली. पूनावाला हे एका पारसी कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील सायरस पूनावाला यांनी 1966 मध्ये एसआयआयची स्थापना करण्यापूर्वी घोडेबाजारातून आपले नशीब कमावले. अदार पूनावाला गेल्या वर्षी लंडनमध्ये 1,446 कोटी रुपयांचे घर खरेदी केले होते.

FAQ

1 IPL २०२५ मध्ये RCB बाबत काय विशेष घडले?
 IPL २०२५ मध्ये RCB ने १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ट्रॉफी जिंकली. मात्र, याच वर्षी RCB ची विक्री होणार आहे, जे IPL इतिहासात कधीच घडले नव्हते.

2 RCB ची विक्री कोण करत आहे आणि का?
डायगिओची उपकंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (USL) त्यांचा IPL संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विकण्याची तयारी करत आहे. RCB हा डायगिओसाठी "नॉन-कोअर" व्यवसाय आहे, म्हणून ते विकू इच्छितात.

3  RCB साठी किती किंमत ठेवली आहे आणि कोण खरेदी करणार आहे?
USL ला RCB साठी २ अब्ज डॉलर्स (अंदाजे १७,७६२ कोटी रुपये) चे मूल्यांकन हवे आहे. पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला हे या संघाला खरेदी करण्यासाठी आघाडीवर आहेत.

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More