Rishabh Pant : टीम इंडियाला (Team India) जणू दुखापतींचं ग्रहण लागलंय. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) नंतर सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये (IPL 2023) टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) देखील दुखापतग्रस्त झालाय. यामुळे अनफीट खेळाडूंच्या (Unfit Players) लिस्टमध्ये अजून एकाची भर पडलीये. मात्र एकीकडे अनफीट खेळाडूंची लिस्ट वाढत असताना टीम इंडियाचा स्टार खेळाडूची चांगली रिकव्हरी होत असतानाचा व्हिडीओ आता व्हायरल झालाय. हा खेळाडू दुसरा-तिसरा कोणीही नसून ऋषभ पंत (Rishabh Pant) आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऋषभ पंतचा गंभीर अपघात झाला होता. या अपघातात पंतला जबर मारही लागला होता. यानंतर पंतवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यातून रिकव्हर होत असताना आता ऋषभ वॉकरविना चालू लागलाय. त्याची ही रिकव्हरी पाहून चाहतेही फार खूश झाले आहेत. 


पंतने पोस्ट केला नवा व्हिडीओ


शुक्रवारी ऋषभ पंतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पंत वॉकरविना चालताना दिसतोय. पंत अपघातानंतर पहिल्यांदाच आधाराविना चालताना दिसतोय. 


तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, पहिल्यांदा पंत वॉकर घेऊन चालताना दिसतोय. या व्हिडीओला पंतने केजीएफचं म्युसिक लावलंय. थोडं चालून पंत हातातील वॉकर अगदी स्टाईलने समोरच्या व्यक्तीकडे फेकतोय आणि आता तो आधाराविना चालू शकतोय, हे दाखवून देतोय. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)


फोटोला खास कॅप्शन


पंतने त्याच्या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केलाय. यावेळी या व्हिडीओला पंतने कॅप्शन दिलंय की, Happy NO MORE CRUTCHES Day!