VIDEO: कर्णधारपद बदलल्यानंतर पहिल्यांदाच आमनेसामने आले रोहित आणि शुभमन, दोघांमध्ये काय बोलणं झालं?

Rohit Sharma Shubhman Gill Ind vs Aus: भारतीय एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून टाकल्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल पहिल्यांदाच समोरासमोर आले. त्यांच्या संभाषणाचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 16, 2025, 08:34 AM IST
VIDEO: कर्णधारपद बदलल्यानंतर पहिल्यांदाच आमनेसामने आले रोहित आणि शुभमन, दोघांमध्ये काय बोलणं झालं?
Rohit Sharma and Shubman Gill meeting for the first time After Captaincy Change video viral

Rohit Sharma vs  Shubhman Gill Ind vs Aus: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गेला आहे, पण त्याआधी विमानतळावर घडलेला प्रसंग सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. कर्णधारपद बदलल्यानंतर पहिल्यांदाच रोहित शर्मा आणि शुभमन गिल आमनेसामने आले आणि दोघांमधला तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ते दोघे भेटल्यावर एकमेकांशी काय बोलले याबद्दल त्यांच्या  चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात. 

Add Zee News as a Preferred Source

विमानतळावर घडलेले खास दृश्य

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. मात्र, संघाच्या उड्डाणाआधी विमानतळावर जो प्रसंग घडला, त्याने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधले. कर्णधारपद बदलल्यानंतर रोहित आणि गिल पहिल्यांदा एकत्र आले आणि त्यांचा तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. बीसीसीआयने आपल्या अधिकृत एक्स (X) अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हे ही वाचा: Video: ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारताच्या ‘नो हँडशेक’ भूमिकेची उडवली खिल्ली, IND vs AUS पूर्वी ऑस्ट्रेलियाचा ‘माइंड गेम’ सुरू!

 

काय दिसते व्हायरल व्हिडीओमध्ये.. 

व्हिडीओमध्ये दिसते की, खेळाडू हॉटेलमधून एअरपोर्टकडे रवाना होत असताना शुभमन गिलने रोहित शर्मा यांना पाहिले आणि  पुढे जाऊन त्यांना मिठी मारली. दोघांच्या चेहऱ्यावरही स्मितहास्य होते आणि थोड्या वेळ त्यांनी आपसात हलकीफुलक्या गप्पा मारल्या. रोहितने मजेशीर अंदाजात विचारले, “आणि भाई, काय हाल आहे?” त्यावर गिलनेही हसतच उत्तर दिले. काही क्षणांच्या या संवादानंतर दोघेही टीम बसकडे निघून गेले.

 

गिलकडे कर्णधारपद, रोहित खेळाडू म्हणून कायम

अलीकडेच बीसीसीआयने वनडे संघाचं नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवलं आहे. रोहित शर्माने भारतासाठी अनेक अविस्मरणीय विजय मिळवले असले तरी आता तो फक्त खेळाडू म्हणून संघात राहणार आहे. या निर्णयानंतर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र, विमानतळावर दिसलेलं हे दृश्य पाहून स्पष्ट झालं की संघातील वातावरण सकारात्मक आणि एकजूट आहे.

 हे ही वाचा: पाकिस्तानने वर्ल्ड चॅम्पियनला मागे टाकलं, जिंकूनही भारत कोणत्या स्थानावर? WTC Points Tableमध्ये उलथापालथ!

 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गिलची पहिली मोठी परीक्षा

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात तीन वनडे सामने खेळणार असून, 19 ऑक्टोबरपासून मालिकेला सुरुवात होईल. ही मालिका गिलसाठी कर्णधार म्हणून पहिली मोठी कसोटी ठरणार आहे. तरुण नेतृत्वाखाली संघाला नवी ऊर्जा आणि दिशा देण्याची ही त्याच्यासाठी मोठी संधी आहे.

भारताचा पहिला ताफा रवाना

भारतीय संघाचा पहिला बॅच बुधवारी सकाळी 9 वाजता नवी दिल्लीहून पर्थकडे रवाना झाला. या ताफ्यात शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अर्शदीप सिंह, यशस्वी जायसवाल, ध्रुव जुरेल आणि मोहम्मद सिराज हे खेळाडू होते. तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि उर्वरित खेळाडूंचा दुसरा ताफा 15 ऑक्टोबरच्या रात्री निघाला.

भारताचा वनडे संघ (Team India ODI Squad vs Australia)

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), नीतीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आणि यशस्वी जायसवाल.

 हे ही वाचा: कधी पासून सुरु होणार IND vs AUS 1st ODI? जाणून घ्या कुठे बघता येईल Free लाईव्ह सामना

एअरपोर्टवरील या छोट्या क्षणाने चाहत्यांना दाखवून दिलं की, मैदानाबाहेर स्पर्धा असली तरी, संघातली नाती अजूनही घट्ट आणि सकारात्मक आहेत.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More