)
Rohit Sharma And Virat Kohli : भारताचे दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोघांनी सिडनीत खेळवण्यात आलेल्या वनडेच्या तिसऱ्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करून जवळपास 171 धावांची पार्टनरशिप केली. त्यांनी टीम इंडिया समोरील विजयाचं आव्हान पूर्ण केलं आणि यासह दोघांनी आतासुद्धा वनडे फॉरमॅटमध्ये आपल्या फलंदाजीने धावांचा पाऊस पाडू शकतात हे पुन्हा सिद्ध केलं. सिडनीत खेळवण्यात आलेल्या वनडे सामन्यात भारताने 9 विकेटने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या जबरदस्त खेळीनंतर दोन्ही दिग्गजांनी संकेत दिले की कदाचित हा ऑस्ट्रेलियातील त्यांचा शेवटचा सामना होता. त्यांनी सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाला धन्यवाद दिले. परंतू या दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे CEO टॉड ग्रीनबर्ग यांनी रोहित आणि विराटला BBL मध्ये घेऊन येण्याचे संकेत दिले.
बिग बॅश लीगच्या पुढील सीजनमध्ये भारताचा माजी गोलंदाज आर अश्विन खेळताना दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आयपीएलमधून सुद्धा निवृत्ती घेतली होती. आर अश्विन हा ऑस्ट्रेलियाच्या बीबीएलमध्ये खेळणारा पहिला कॅप्ड भारतीय क्रिकेटर आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे CEO टॉड ग्रीनबर्ग यांना विचारण्यात आलं की BBL मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली सारखे दिग्गज खेळाडू खेळू शकतील का? यावर ग्रीनबर्गने म्हटले की, 'काही विशिष्ट परिस्थितीत, हे शक्य होऊ शकते. आपण याबाबत संवाद सुरू ठेवला पाहिजे'. दरम्यान ग्रीनबर्गने रविचंद्रन अश्विनच्या कराराचा उल्लेख करत म्हटले की रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंना बीबीएलमध्ये खेळणं अशक्य नाहीये. त्यांनी बीबीएलला खाजगी लीग बनवण्याबद्दल सुद्धा वक्तव्य केलं ज्याची सध्या चर्चा सुरू आहे.
आर अश्विनने BBL च्या पुढील सीजनमध्ये सिडनी थंडरसाठी खेळणार आहे. परंतू हे त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यावरच शक्य झालं. रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्त झाले तरी BBL मध्ये खेळू शकत नाहीत. आयपीएलमधून निवृत्त झाल्यानंतरच तो बीबीएलमध्ये खेळण्यास पात्र ठरेल.
सिडनी ODI सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी काय कामगिरी केली?
उत्तर: सिडनीत खेळवलेल्या वनडे तिसऱ्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी १७१ धावांची जबरदस्त भागीदारी केली. त्यामुळे भारताने ९ विकेटने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विजय मिळवला. या खेळाने त्यांनी वनडे फॉरमॅटमध्ये आपली फलंदाजी अजूनही धावांचा पाऊस पाडू शकते हे सिद्ध केले.
सिडनी सामन्यानंतर विराट आणि रोहित यांनी काय संकेत दिले?
उत्तर: सामन्यानंतर दोघांनीही संकेत दिले की हा कदाचित ऑस्ट्रेलियातील त्यांचा शेवटचा सामना असू शकतो. त्यांनी ऑस्ट्रेलियाला धन्यवाद दिले आणि भावनिक क्षण जगासमोर आले.
आर अश्विनने BBL मध्ये काय करार केला आहे?
उत्तर: भारताचा माजी गोलंदाज आर अश्विन BBL च्या पुढील सीजनमध्ये सिडनी थंडर संघाकडून खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो BBL मध्ये खेळणारा पहिला कॅप्ड भारतीय क्रिकेटर ठरला आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा BBL मध्ये खेळू शकतील का?
उत्तर: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पूर्ण निवृत्ती घेतल्यानंतरही ते BBL मध्ये खेळू शकणार नाहीत. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतरच ते BBL साठी पात्र ठरतील, जसे अश्विनने केले. BBL ही आता खाजगी लीग असल्याने हे नियम कठोर आहेत.