IND VS ENG Test : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि टी 20 वर्ल्ड कप 2025 च विजेतेपद जिंकलं. यापूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती, तिथे खेळवण्यात आलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचं प्रदर्शन अतिशय खराब होतं. त्यामुळे कर्णधार म्हणून रोहित शर्मावर बरीच टीका झाली. परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर सर्वांनाच याच उत्तर मिळालं. टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून तेथे दोन्ही संघांमध्ये टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. तेव्हा या सीरिजमध्ये टीम इंडियाचा कर्णधार कोण असणार यावर मोठी अपडेट समोर आली आहे.
टीम इंडिया जून आणि जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार असून आयपीएलनंतर लगेचच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी निघेल. इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार या सीरिजमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व हे रोहित शर्माच करेल. बीसीसीआय पुन्हा एकदा या सीरिजसाठी रोहित शर्मावर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवू शकते. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकला. त्यानंतर त्याच्याच नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं विजेतेपद पटकावण्यास सुद्धा टीम इंडियाला यश आले. तर भारत वनडे वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये सुद्धा पोहोचला होता. रिपोर्टनुसार बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना रोहित शर्मावर पूर्ण विश्वास आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईल असे सांगितले जात होते. मात्र रोहितने फायनल जिंकल्यावर त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम देत तो इतक्यात निवृत्त होणार नसल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा : 'फक्त एकच मंत्र होता...' सहखेळाडूने सांगितलं धोनीचं सिक्रेट, आपल्या संघाला असं बनवतो चॅम्पियन
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलमध्ये सुद्धा एंट्री घेतली होती. मात्र त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले. रोहितने आतापर्यंत 67 टेस्ट सामने खेळले असून यात एकूण 4302 धावा केल्या. रोहितने 12 शतक आणि 18 अर्धशतक केली असून यात त्याने एक द्विशतक सुद्धा ठोकलंय. रोहित शर्माने वनडेत 11168 धावा केल्या असून 273 सामने खेळले आहे.