)
IND VS AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 25 ऑक्टोबर रोजी तीन सामन्यांच्या वनडे सीरिजमधील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 9 विकेट्सने विजय मिळवला. यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज फलंदाजांची खेळी अत्यंत महत्वपूर्ण ठरली. त्यांनी जवळपास 117 धावांची पार्टनरशिप केली. सीरिजमधील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये रोहित विराटचा परफॉर्मन्स फार चांगला नव्हता, ज्यामुळे त्यांना ट्रोल सुद्धा करण्यात आलं. त्यांच्या फॉर्मवरून निवृत्ती संदर्भातील वावड्या सुद्धा उठल्या. मात्र रोहित आणि विराटने सिडनी सामन्यात ट्रॉलर्सला चांगलं उत्तर दिलं. परंतू त्यानंतर आता सीरिज संपल्यावर सिडनी एअरपोर्टवरून मायदेशी परतत असताना रोहित शर्माने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. ज्याच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज फलंदाजांच्या फॉर्मबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अशातच पर्थ वनडे सामन्यात दोघे समाधानकारक धावा करण्यात अयशस्वी ठरले. रोहितने 8 तर विराटने यात शून्य धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने 70 हून अधिक धावा केल्या मात्र विराट पुन्हा धावांचं खातं उघडण्यास अयशस्वी ठरला होता. मात्र तिसऱ्या सामन्यात दोघांनीही ही कसर भरून काढली. विराट आणि रोहितने तब्बल 171 धावांची पार्टनरशिप केली आणि त्यांच्या ट्रॉलर्सला गप्प केलं आहे. रोहित शर्माने 105 बॉलमध्ये नाबाद 100 धावा पूर्ण केल्या आणि 11 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. रोहित शर्माचं हे आंतरराष्ट्रीय करिअरमधील 50 वं शतक ठरलं. तर विराट कोहलीने सुद्धा 74 धावांची खेळी केली.
रोहित शर्माने सोशल मीडियावर इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. ज्यात तो ऑस्ट्रेलिया एअरपोर्टवर दिसत असं पुन्हा मायदेशी परतत आहे. या फोटोवर कॅप्शन देताना रोहितने लिहिले, 'एकदा शेवटचं, सिडनीवरून सायनिंग ऑफ'. रोहितने सिडनी वनडे सामन्यानंतर सुद्धा ही सीरिज ऑस्ट्रेलियातील त्याची शेवटची सीरिज ठरू शकते असं म्हंटल होतं. सामना संपल्यावर रवी शास्त्री यांनी विराट कोहली आणि रोहित शर्माची मुलाखत घेतली. यावेळी रोहित म्हणाला, 'मला इथे यायला नेहमीच खूप आवडले आणि मला इथे (सिडनीमध्ये) क्रिकेट खेळून खूप मजा आली. 2008 च्या आठवणी (ऑस्ट्रेलियाचा पहिला दौरा) परत जाग्या झाल्या. मला माहित नाही पुन्हा कधी इथे परत येऊ की नाही पण मी प्रत्येक क्षणाचा भरपूर आनंद घेतला. गेल्या काही वर्षांत आम्हाला मिळालेल्या सर्व कौतुकानंतरही, आम्हाला क्रिकेट खेळण्याचा खूप आनंद मिळाला आहे. गेल्या 15 वर्षात जे काही घडले ते विसरून जा, मला नेहमीच इथे खेळायला आवडते आणि मला वाटते विराटलाही ते आवडते. धन्यवाद, ऑस्ट्रेलिया'. या विधानाने चाहत्यांमध्ये निवृत्तीबाबत शंका निर्माण झाली.

२५ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्याचा निकाल काय झाला?
उत्तर: सिडनी येथे झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ९ विकेट्सने विजय मिळवला. यामुळे सीरीज २-१ ने ऑस्ट्रेलियाच्या नावावर गेली, पण भारताने शेवटचा सामना जिंकला.
तिसऱ्या सामन्यात रोहित आणि विराट यांनी ट्रॉलर्सला कसं उत्तर दिलं?
उत्तर: तिसऱ्या सामन्यात दोघांनी जबरदस्त खेळी करून १७१ धावांची पार्टनरशिप केली आणि भारताला ९ विकेट्सने विजय मिळवून दिला. यामुळे ट्रॉलर्स गप्प झाले आणि चाहत्यांनी त्यांच्या कमबॅकचं कौतुक केलं.
रोहित शर्माने इंस्टाग्राम स्टोरीवर काय शेअर केलं आणि त्याचं कॅप्शन काय होतं?
उत्तर: सिडनी एअरपोर्टवरून मायदेशी परतताना रोहितने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली, ज्यात तो दिसत होता. कॅप्शन: 'एकदा शेवटचं, सिडनीवरून सायनिंग ऑफ'. हे कॅप्शन चाहत्यांच्या लक्ष वेधून घेतलं आणि निवृत्तीबाबत चर्चा सुरू झाली.