Playing 11 for MI vs LSG match : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्याला सुरुवात झाली आहे या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने मोठे बदल केले आहे, आजचा सामना मुंबई इंडियन्सच्या संघाला जिंकणे अनिवार्य आहे.

Playing 11 for Mumbai Indians vs Lucknow Super Giants match : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये आज सामना खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये मुंबईच्या संघाला आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे नाही तर संघ पूर्णपणे प्लेऑफच्या शर्यतीमधून बाहेर होणार आहे. आजचा हा वानखेडेच्या मैदानावर शेवटचा सामना असणार आहे, त्यानंतर मुंबई सर्व सामने हे घरच्या मैदानावर खेळणार नाही. त्यामुळे आजचा सामन्यामध्ये दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. संघासाठी महत्वाचा सामना असताना आज मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये आजच्या सामन्यात मोठे बदल करण्यात आले आहे. संघातील सर्वात मोठा बदल म्हणजेच संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या हा संघामध्ये खेळणार नाही.
आजच्या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर हार्दिक पांड्या हा प्लेइंग 11 चा भाग नाही. त्याचबरोबर रोहित शर्माचे संघामध्ये पुनरागमन झाले आहे. मागील काही सामन्यांमध्ये सातत्याने मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी पाहायला मिळाली. आज संघाने प्लेइंग 11 मध्ये काही बदल केले आहेत, यामध्ये दुखापतीमुळे रोहित शर्माने मागील काही सामने खेळला नाही. तर आजच्या सामन्यामध्ये हार्दिक पांड्या हा त्याची तब्ब्येत खराब असल्यामुळे तो खेळणार नाही. त्याचबरोबर रॅाबिन मिन्जयाला देखील आजच्या सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले नाही.
त्याचबरोबर आज प्लेइंग 11 मध्ये कॅार्बिन बॅाश याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर राज बावा याला देखील आज खेळण्याची संधी मिळाली आहे. सुर्यकुमार यादव आज संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे, त्याचबरोबर रघु शर्माला आणखी एक संधी मिळाली आहे, आजच्या सामन्यामध्ये रोहित शर्मा संघामध्ये इम्पॅक्ट खेळाडू म्हणून संघामध्ये सामील होणार आहे.
हे ही वाचा
लखनऊ सुपर जायंट्सच्या प्लेइंग 11 बद्दल सांगायचे झाले तर आज ऑस्ट्रेलियन विकेटकिपर आणि फलंदाज जोश इंग्लिश याचे संघामध्ये आगमन झाले आहे, तर काही युवा खेळाडूना संघामध्ये स्थान मिळाले होते त्यांना आज प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही.
मुंबई इंडियन्स : सूर्यकुमार यादव (कर्णधार), रायन रिकेल्टन (विकेटकिपर), नमन धीर, तिलक वर्मा, विल जॅक्स, राज बावा, कॉर्बिन बोश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, एएम गझंफर, रघु शर्मा.
इम्पॅक्ट प्लेयर्स: रोहित शर्मा, मयंक रावत, रॉबिन मिंज, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट.
लखनऊ सुपर जायंट्स: मिशेल मार्श, एडन मार्कराम, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), जोश इंगलिस, निकोलस पूरन, अक्षत रघुवंशी, हिम्मत सिंग, मोहम्मद शमी, मोहसिन खान, आवेश खान, प्रिन्स यादव.
इम्पॅक्ट प्लेयर्स: मणिमारन सिद्धार्थ, दिग्वेश सिंग राठी, मयंक यादव, शाहबाज अहमद, अब्दुल समद.