Rohit Sharma at Shivaji Park: भारतीय क्रिकेटचा 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची जोरदार तयारी करत आहे. तो शिवाजी पार्कवर दररोज नेट्समध्ये घाम गाळत आहे. याच दरम्यान त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
टेस्ट आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा वनडे संघाचं नेतृत्व करत होता. मात्र, आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम मॅनेजमेंटने तरुण शुभमन गिलवर विश्वास ठेवत त्याला कर्णधारपद दिलं आहे. त्यामुळे रोहित आता संघातील सीनियर खेळाडू म्हणून काम पाहणार आहे. पण या बदलाचा रोहितवर अजिबात परिणाम झालेला दिसत नाही. त्याच्या स्वभावातला तो माणुसकीचा गुण पुन्हा एकदा समोर आला आहे.
हे ही वाचा: ‘2-3 जणांनी मला थांबवलं...’, आर.अश्विनने केला निवृत्तीमागचा मोठा खुलासा! रोहित-गंभीरवरही बोलला
शिवाजी पार्कवर सराव सुरू असताना रोहितचा एक छोटा फॅन त्याला भेटण्यासाठी आला. पण, त्या मुलाला सिक्युरिटी गार्ड्स आणि काही लोकांनी पुढे जाण्यापासून थांबवलं. हे दृश्य पाहताच रोहितने तत्काळ गार्डवर आवाज चढवला आणि मुलाला भेटण्यास परवानगी दिली. नंतर रोहित स्वतः त्या मुलाला भेटला आणि त्याच्याशी काही क्षण बोललाही. हा प्रसंग पाहून उपस्थित लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि सोशल मीडियावरही या घटनेचं व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला.
हे ही वाचा: Rohit Sharma: ‘रोहित शर्मा युग संपलं’, ‘हिटमॅन’च्या एका पोस्टमुळे विश्व क्रिकेटमध्ये खळबळ!
रोहितचा हा हृदयस्पर्शी क्षण पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं. अनेकांनी कमेंटमध्ये लिहिलं की, “कॅप्टनसी गेली असेल पण क्लास कायम आहे.” तर काहींनी त्याला “फॅन्ससाठी जगणारा सुपरस्टार” असं म्हटलं.
हे ही वाचा: Video: धोनीचा आवाज ऐकताच जोरजोरात हसू लागले रोहित शर्मा आणि रितिका सजदेह, जाणून घ्या नेमकं कारण
दरम्यान, रोहित शर्मा आपला लक्ष आगामी 2027 च्या वनडे वर्ल्ड कपकडे ठेवून आहे. त्याला अजून एकदा भारतासाठी मोठं टूर्नामेंट जिंकायचं स्वप्न आहे. मात्र, टीम मॅनेजमेंटकडून अजून त्याबाबत कोणतं स्पष्ट संकेत मिळालेलं नाही. वय वाढल्यामुळे रोहित आणि विराट कोहलीला आगामी योजनांमध्ये फारसं स्थान मिळणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. पण हिटमॅनचा जिद्दीपणा पाहता, तो अजूनही हार मानायला तयार नाही!
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.