विराट - रोहित 'ऑन फादर्स ड्युटी', मैदानापासून दूर असलेले दिग्गज मुलांसोबत घालवतायत वेळ, Video Viral

Virat Kohli With Son Akaay : विराट कोहली आणि रोहित शर्मा सध्या फादर्स ड्युटीवर आहेत. सध्या विराटचा मुलगा अकाय सोबतचा तर दुसरीकडे रोहित शर्माचा मुलगा अहान सोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.   

पूजा पवार | Updated: Mar 3, 2026, 05:52 PM IST
विराट - रोहित 'ऑन फादर्स ड्युटी', मैदानापासून दूर असलेले दिग्गज मुलांसोबत घालवतायत वेळ, Video Viral
Photo Credit - Social Media

Virat Kohli With Son Akaay : टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे दोघे सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहेत. दोघांनी टी20 क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने ते सध्या टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाचा भाग नाहीत. अनेक भारतीय फॅन्स त्यांना क्रिकेटच्या मैदानात मिस करत आहेत. मात्र विराट कोहली आणि रोहित शर्मा सध्या नॅशनल ड्युटीवर नाहीत तर फादर्स ड्युटीवर आहेत. विराट कोहलीचा लंडन येथील मुलगा अकाय  सोबतचा व्हिडीओ एकीकडे व्हायरल होतोय, तर दुसरीकडे रोहित शर्माचा मुलगा अहान सोबत अम्युसमेंट पार्कमधील व्हिडीओ व्हायरल होतोय. 

Add Zee News as a Preferred Source

रोहित शर्मा मुलगा अहान सोबत खेळताना : 

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याचा मुलगा अहान सोबत अम्युसमेंट पार्कमधील एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात बाप लोकांची जोडी कूल कपड्यात एकमेकांसोबत जबरदस्त दिसतेय. रोहित शर्मा मुलगा अहान सोबत एका टॉय ट्रेनमध्ये बसलेला दिसून येत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत गोंडस अहान वडील रोहितचा हात पकडून चालताना दिसतोय. रोहित शर्मा आणि पत्नी रितिका सजदेह या दोघांना 15 नोव्हेंबर 2024 रोजी पुत्ररत्न प्राप्त झाला ज्याचं नाव त्यांनी अहान असं ठेवलं. 

पाहा व्हिडीओ : 

लंडनच्या रस्त्यांवर दिसले विराट आणि अकाय : 

टी20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर विराट कोहली जेव्हा सामने खेळत नसतो तेव्हा तो कुटुंबासोबत लंडनला राहतो. अशातच लंडनच्या रस्त्यांवर विराट कोहली आणि अकाय हे फिरताना दिसतायत. लहानगा अकाय वडील विराटचा हात पकडून चालताना दिसतोय. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या घरी 15 फेब्रुवारी 2024 मध्ये मुलाचा जन्म झाला ज्याचं नाव नंतर अकाय असं ठेवण्यात आलं. 

हेही वाचा : टीम इंडियासाठी एक दोन नाही तर तब्बल 5 धोक्याचे इशारे, वेळीच सुधारले नाही तर सेमीफायनलमध्ये होणार पराभव

 

पाहा व्हिडीओ : 

2027 वर्ल्ड कपसाठी तयारी करतायत विराट आणि रोहित : 

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये खेळण्यासाठी तयारी करत आहेत. विराट आणि रोहित हे दोघे मागील काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिजमध्ये खेळताना दिसले. यात विराट कोहली हा टीम इंडियाकडून सर्वाधिक 240 धावा करणारा फलंदाज होता. 

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More