Ruturaj Gaikwad : आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) आता एका खास क्लबमध्ये एंट्री झाली आहे. तो सचिन तेंडुलकर, युवराज सिंह आणि चेतेश्वर पुजारानंतर यॉर्कशायरकडून काऊंटी खेळणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. जुलैमध्ये स्कारबोरो येथे सरे विरुद्ध होणाऱ्या रोथेसेच्या काउंटी चॅम्पियनशिप सामन्यापूर्वी ऋतुराज यॉर्कशायर संघात सामील होईल.
ऋतुराज गायकवाड सध्या इंग्लंडमध्ये असून तो भारताच्या ए संघात खेळत होता. तो मेट्रो बँक वनडे कपमध्ये सिलेक्शनसाठी सुद्धा उपलब्ध असेल. ऋतुराज आयपीएलमध्ये चेन्नई तर रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राची कमान सांभाळताना सुद्धा दिसला. ऋतुराज गायकवाडने आपल्या करिअरमध्ये आतपर्यंत 6 टी 20, 6 वनडे खेळले आहेत. ऋतुराज हा टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे.
ऋतुराज गायकवाडने म्हटले की, 'मी इंग्लंडच्या उर्वरित देशांतर्गत सत्रसाठी यॉर्कशायरसोबत जुडण्यास उत्सुक आहे. या देशात क्रिकेटचा अनुभव करणे नेहमीच माझं लक्ष राहिलं आहे. इंग्लंडमध्ये यॉर्कशायरपेक्षा मोठा कोणताही क्लब नाही. मला माहितीये की हे किती महत्वपूर्ण आहे. मला सीजनच्या सर्वात महत्वपूर्ण भागात जबरदस्त प्रदर्शन करायचे आहे. काउंटी चॅम्पियनशिपमध्ये आमच्याकडे खूप महत्वपूर्ण खेळ आहे'.
हेही वाचा : IPL 2025 मध्ये धावांचा कहर करणाऱ्या 29 वर्षीय खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
हेड कोच एंथनी मॅकग्राथला सांगितले की, 'ऋतुराज गायकवाड दुसऱ्या भागात आमच्या सोबत जोडला जाणार यासाठी मी खूप खुश आहे. तो एक खूप कुशल क्रिकेटर आहे. त्याचा नैसर्गिक अष्टपैलू खेळ आपल्याला ज्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळायचे आहे त्याला अनुकूल आहे. ऋतुराज आपली फलंदाजी लाइनअप मजबूत करेल. गरज पडल्यास जलद धावा करण्याची क्षमता देखील त्याच्यात आहे'. 20 जून पासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज सुरु होणार आहे. यात ऋतुराज गायकवाडचा समावेश करण्यात आला नाही. तसेच आयपीएल २०२५ मध्ये सुद्धा ऐन सीजनमधून ऋतुराजला दुखापतीच्या कारणामुळे बाहेर पडावं लागलं होतं.