सचिन तेंडुलकरने केलं धोनीचं कौतुक

सचिनने धोनीबद्दल विश्वास केला व्यक्त

Updated: Jan 17, 2019, 11:25 AM IST
सचिन तेंडुलकरने केलं धोनीचं कौतुक

मुंबई : महेंद्र सिंह धोनीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या वनडेमध्ये ज्या प्रकारे सामना संपवला त्यानंतर त्यांचं कौतुक होण्यास सुरुवात झाली. कौतुक करणाऱ्यांच्या यादीत आणखी एक नाव आलं ते म्हणजे भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर. धोनीचं कौतुक करत त्याने म्हटलं की, 'पुन्हा एकदा फिनिशिंगचं कौशल्य दाखवलं. मला पूर्ण आशा आहे की, शेवटपर्यंत इनिंगला पुढे घेऊन जाईल.'

माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने महेंद्र सिंह धोनीच्या कामगिरीचं कौतुक केलं. सचिन तेंडुलकरने त्याच्या अॅपमध्ये म्हटलं की, 'धोनीचं योगदान खूपच छान होतं. पहिल्या सामन्यात धोनी लयमध्ये मला दिसला नाही. तो बॉलला त्याला हवं तिथे हिट करु शकत नव्हता. पण दुसऱ्या मॅचमध्ये तो वेगळ्या अंदाजात दिसला. पहिल्या बॉलपासून तो वेगळा खेळाडू वाटत होता.'

एमएस धोनीला इनिंग पुढे घेऊन जाण्यात आणि फिनिश करण्यात माहिर आहे. प गेल्या काही दिवसांपासून त्याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. सचिन म्हणतो की, 'तो असा खेळाडू आहे जो काही बॉल असेच सोडणं पसंद करतो. तो विकेटला समजून घेतो. गोलंदाजी संमजून घेतो त्यानंतर शेवटी सामन्याला शेवटपर्यंत घेऊन जातो. तो असा खेळाडू आहे जो एकाबाजुने इनिंगला नियंत्रणात ठेवू शकतो.'

सचिन तेंडुलकरने दिनेश कार्तिकचं देखील कौतुक केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने धोनीला चांगली साथ दिली. धोनीसोबत दिनेश कार्तिकने देखील चांगला खेळ दाखवला. तो आला आणि सामना शेवटपर्य़ंत घेऊन गेला. दिनेशचं देखील शानदार योगदान होतं. धोनी शेवटपर्यंत राहिला आणि त्याचा अनुभव कामात आला.' 

भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी म्हटलं की, 'कृपया या खेळाडूला सोडून द्या. मी प्रार्थना करतो. त्याला एकट सोडून द्या. तो चांगलं खेळणं सुरु ठेवेल. धोनीचं टीममध्ये असलेलं महत्त्व याबाबत काही आकलन नाही केलं जावू शकत. विश्वास ठेवा तो चांगली कामगिरी करेल.'