Lionel Messi At Mumbai : फुटबॉलचा (Football) बादशाह लिओनेल मेस्सी (Lionel Messi) हा तब्बल 14 वर्षांनी भारतात आलाय. मेस्सी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून तो कोलकाता, हैद्राबाद, मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये कार्यक्रम घेऊन त्याच्या फॅन्सना भेटणार आहे. मेस्सीचा हा भारत दौरा त्याच्या भारतीय फॅन्ससाठी खूपच खास आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या फुटबॉलरची एक झलक पाहायला मिळावी यासाठी फॅन्स भारतातील विविध शहरांमधून मेस्सी भेट देणाऱ्या शहरांमध्ये पोहोचत आहेत. रविवार 14 डिसेंबर रोजी लिओनेल मेस्सी हा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दाखल झाला. येथे वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात फॅन्स सह सेलिब्रिटी आणि राजकीय व्यक्ती देखील मेस्सीला भेटण्यासाठी उपस्थित होते.
वानखेडे स्टेडियमवर लिओनेल मेस्सीचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेता अजय देवगण, फुटबॉलर सुनील छेत्री इत्यादी उपस्थित होते. मेस्सी वानखेडेवर उपस्थित त्याच्या फॅन्सना भेटला तसेच युवा खेळाडूंसह फुटबॉल सुद्धा खेळला. त्यानंतर ‘प्रोजेक्ट महादेवा‘चं उद्घाटन करण्यासाठी सचिन तेंडुलकरला मैदानात बोलावण्यात आले, तेव्हा मेस्सी समोर असताना संपूर्ण वानखेडे स्टेडियम सचिन, सचिनच्या आवाजाने दुमदुमलं. एवढंच नाही तर सचिनने बोलताना मराठीतून बोलण्यास सुरुवात केली.
सचिन तेंडुलकरने लिओनेल मेस्सी समोर चाहत्यांना मराठीतून संबोधित केले. सचिन सुरुवातीला म्हणाला, 'नमस्कार मुंबई, काय कसं काय? सर्वप्रथम माझ्या वतीने सर्वांना धन्यवाद.आपण मुंबईत आहोत. तुम्ही ज्यापद्धतीने लिओ, लुईस आणि रॉड्रिग्संचं स्वागत केलं त्यासाठी धन्यवाद'. यानंतर सचिनने पुढे इंग्रजीतून बोलण्यास सुरुवात केली. सचिनच्या या मराठमोळ्या अंदाजाने सर्वांची मनं जिंकली. सचिन तेंडुलकरने मेस्सीला आपली 10 नंबरची भारताची जर्सी भेट केली. ज्यावर सचिनचा ऑटोग्राफ होता. सचिन आणि मेस्सीने सोबत फोटो काढला. हा भारताच्या क्रीडा विश्वातील एक ऐतिहासिक क्षण होता.
‘प्रोजेक्ट महादेवा‘चं उद्घाटन करण्यासाठी आलेल्या सचिनने यावेळी वानखेडे विषयी आपल्या काही आठवणी शेअर केल्या. तो म्हणाला, 'मी इथे वानखेडे स्टेडियममध्ये अनेक क्षण अनुभवलेत. आपण मुंबईला स्वप्न नगरी म्हणतो. याच मैदानात अनेक स्वप्न पूर्ण झाली आहेत. या मैदानावर 2011 साली तुमच्या पाठिंब्याशिवाय सुवर्णक्षण अनुभवता आला नसता'.
VIDEO | Maharashtra: Amid loud cheers, Indian cricket legend Sachin Tendulkar gifts Argentine football icon Lionel Messi the 2011 World Cup jersey, calling it a golden moment for Mumbai and India.
लिओनेल मेस्सी भारतात किती वर्षांनंतर आला आहे?
लिओनेल मेस्सी तब्बल १४ वर्षांनंतर भारतात आला आहे.
सचिन तेंडुलकरने मेस्सीला काय भेट दिली?
सचिनने मेस्सीला आपली १० नंबरची भारताची जर्सी भेट केली, ज्यावर त्याचा ऑटोग्राफ होता.
सचिनने चाहत्यांना कशाप्रकारे संबोधित केले?
सचिनने सुरुवातीला मराठीत बोलून 'नमस्कार मुंबई, काय कसं काय?' असे म्हटले आणि नंतर इंग्रजीत बोलले.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.