Sarfaraz Khan Younger Brother Musheer Khan Scores a Century : रणजी ट्रॉफीमध्ये हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा युवा फलंदाज मुसीर खान (112) याने जबरदस्त फलंदाजी करत शतक ठोकले. परंतु त्याच्या या शानदार कामगिरीच्या मागे एक हृदयस्पर्शी कथा दडली होती. सामना सुरू होण्याच्या काही तास आधीच मुसीरच्या मामाचे निधन झाले होते. ही बातमी ऐकताच तो पूर्णपणे व्यथित झाला होता, पण काही तासांनंतर त्याने मैदानात उतरून जिद्दीने शतक ठोकत मामाच्या आठवणींना सलाम केला.
पहिल्या दिवसाच्या अखेरीस मुंबईने 5 बाद 289 धावा केल्या. सलामीवीर मुसीर खान आणि अनुभवी सिद्धेश लाड यांनी पाचव्या विकेटसाठी 157 धावांची भागीदारी करत संघाला भक्कम स्थितीत पोहोचवले. याआधी टीम इंडियात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या सरफराज खानचा (16) विकेट गमावल्यानंतर मुंबईचा स्कोअर केवळ 73/4 इतका झाला होता. त्या वेळी संघ संकटात होता, पण मुसीर-लाड जोडीने परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकली.
हे ही वाचा: Periods च्या वेदनांवर मात करून कसं खेळता? स्नेह राणा म्हणाली, 'पीरियड्सच्या काळात मी जास्त...'
मुसीर खानने 162 चेंडूत 14 चौकारांसह दमदार 112 धावा केल्या. शतक पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्याने आपला बॅट हवेत उचलला, तेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते. हे फक्त रन नव्हते, तर त्याच्या मामासाठी दिलेली श्रद्धांजली होती. तो म्हणाला, “ही शतकी खेळी माझ्यासाठी खूप खास आहे. मी माझ्या मामूला गमावल्याने खूप व्यथित होतो. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. मी त्यांच्या मांडीवर बसून क्रिकेट खेळायला शिकलो. त्यामुळे हे शतक त्यांच्याच नावाने अर्पण करतो.”
ही मुसीर खानची चौथी प्रथम श्रेणी शतकी खेळी होती आणि गेल्या सप्टेंबरनंतरचं त्याचं पहिलं शतक.
बीकेसीचं एमसीए ग्राउंड मुसीरसाठी खास राहिलं आहे. याच मैदानावर त्याने डिसेंबर 2022 मध्ये सौराष्ट्रविरुद्ध मुंबईकडून फर्स्ट-क्लास पदार्पण केलं होतं. त्यानंतर 2024-25 च्या रणजी मोसमात मुसीरने नॉकआउट फेरीत मुंबईसाठी जबरदस्त कामगिरी केली होती. बडोद्याविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये त्याने 203 आणि 55 धावा ठोकल्या, तर सेमीफायनलमध्ये तामिळनाडूविरुद्ध 55 धावा आणि गोलंदाजी करत 18 धावांत 2 बळी घेतले होते.
हे ही वाचा: Team India Schedule: ऑस्ट्रेलिया दौरा संपला, आता टीम इंडियाचा पुढचा सामना कोणाशी? जाणून घ्या पूर्ण शेड्युल
मुसीर खानचा हा निर्धार आणि भावनिक शतक हे सिद्ध करतात की क्रिकेट केवळ खेळ नाही, तर भावनांचं रणांगण आहे, जिथे मन आणि आत्म्याच्या ताकदीवर खेळाडू मोठे ठरतात.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.