शाहरुख खानच्या मदतीमुळे वाचलं 'या' स्टार क्रिकेटरचं करिअर, हृदयस्पर्शी किस्सा ऐकून डोळे पाणावतील

Shah rukh khan:  भारतात क्रिकेट या खेळाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. लवकरच आयपीएल 2026 सुरु होणार असून चाहते आणि खेळाडू सगळेच खूप उत्सुक आहेत. अशात एका माजी खेळाडूच्या पत्नीने आयपीएल विषयीचा एक हृदयस्पर्शी किस्सा सांगितला आहे.   

Updated: Nov 9, 2025, 05:13 PM IST
शाहरुख खानच्या मदतीमुळे वाचलं 'या' स्टार क्रिकेटरचं करिअर, हृदयस्पर्शी किस्सा ऐकून डोळे पाणावतील

Shah rukh khan helped pujara: चेतेश्वर पुजारा 2010 च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) मध्ये सामील झाला. पण हा माजी भारतीय क्रिकेटपटू एसीएल दुखापतीमुळे केकेआरकडून एकही सामना खेळला नाही,  गुडघ्याची दुखापत एक गंभीर समस्या आहे जी अनेकदा खेळाडूंच्या कारकिर्दीला मोठ्ठा धक्का देते. चेतश्वरला झालेल्या या दुखापतीच्या वेळी केकेआरचा सह-मालक शाहरुख खानने त्याला कशी मदत केली हे आता जगा सोमोर आलं आहे. स्वतः चेतेश्वरच्या पत्नीने तिच्या पुस्तकात या घटनेविषयी सविस्तर लिहीले आहे.

Add Zee News as a Preferred Source

शाहरुख खानने पुजाराला केली मदत
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने म्हटले होते की पुजाराचे भविष्य उज्ज्वल आहे आणि फ्रँचायझीने केपटाऊनमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था केली. चेतेश्वर पुजाराची पत्नीने 'द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ' मध्ये लिहिले आहे की, "नशिबाने त्याला आनावधानाने चेंडूकडे धावण्यास भाग पाडले, परिणामी त्याला गुडघ्यात दुखापत झाली, त्यानंतर शस्त्रक्रिया झाली आणि केकेआरसाठी एकही सामना न खेळता त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला तात्पुरता थांबा लागला." केकेआरने पासपोर्ट, व्हिसा आणि प्रवासासह सर्व व्यवस्थांची काळजी घेतली, अगदी पुजाराच्या वडिलांना तातडीने केपटाऊनला घेऊन गेले.

शाहरुख खानबद्दल पुजाराच्या वडिलांचं वक्तव्य
पुस्तकात पुजाराच्या पत्नीने तर बऱ्याच मुलाखतींमध्ये पुजाराच्या वडिलांनी सांगितले की "शाहरुखने मला म्हणायचा चिंटू (पुजारा) चे भविष्य उज्ज्वल आहे आणि त्याला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजेत. जेव्हा त्याला कळले की मी दक्षिण आफ्रिकेत आधार प्रणालीच्या अभावाबद्दल आणि डॉ. शाह यांच्या क्षमतेवरील माझ्या विश्वासाबद्दल चिंतित आहे, तेव्हा त्याने मला आणि माझ्यासोबत येणाऱ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना आणि फेमिली डॉक्टरांना तिथे घेऊन जाण्याची ऑफर दिली."

पुजा पुजारा यांनी पुस्तकात असेही नमूद केले आहे की केकेआरच्या प्रतिनिधीने पुजाराच्या कुटुंबाला सांगितले की, "तुम्हाला हवे त्या डॉक्टरला आम्ही शस्त्रक्रियेसाठी घेऊन जाऊ. आम्ही त्याचा पुर्ण खर्च देऊ जेणे करून या कठीण परिस्थितीत तुम्हाला मदत होईल." दुखापतीमुळे एकही सामना खेळू न शकलेल्या खेळाडूसाठी अभिनेता शाहरुख खानने उल्लेखनीय काम केले. किंग खानचा हा उदारपणा पाहुन सगळ्यांनाच खूप अभिमान वाटला होता. पुजारावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्याने 4 आयपीएल सामने खेळले.

About the Author