IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला लवकरच सुरुवात होणार आहे. 22 मार्च रोजी या सीजनचा पहिला सामना हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Kolkata Knight Riders VS Royal Challengers Bangluru) या संघांमध्ये होईल. नवा सीजन सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रत्येक संघाचा खेळाडू सरावाच्या मैदानात घाम गाळत आहे. यंदा काही खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने त्यांच्या खेळण्यावर शंका आहे. याचा सर्वात जास्त फटका हा लखनऊ संघाला बसलाय. कारण मयंक यादव, आवेश खान आणि मोहसिन खान हे लखनऊचे तीन खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. यादरम्यान एक मोठी बातमी समोर येत असून असं म्हटलं जातंय की अनुभवी ऑल राउंडर खेळाडू शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) हा रिप्लेसमेंट म्हणून संघासोबत जोडला जाऊ शकतो.
टीम इंडियाचा ऑल राउंडर शार्दूल ठाकूर हा आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा भाग होता. मात्र त्याला आयपीएल 2025 च्या ऑक्शनपूर्वी रिलीज करण्यात आले. शार्दूलने 2 कोटींच्या बेस प्राईजवर आपलं नाव ऑक्शनसाठी नोंदवलं होतं. मात्र या किंमतीवर शार्दूलला आपल्या संघात घेण्यासाठी कोणीही बोली लावली नाही त्यामुळे मराठमोळा क्रिकेटर शार्दूल आयपीएल ऑक्शनच्या पहिल्या राउंडमध्ये अनसोल्ड राहिला.
हेही वाचा : WPL फायनलमध्ये अंपायरचा उडाला गोंधळ! स्वतःच दिलेला OUT चा निर्णय विसरली, Video Viral
ऑल राउंडर शार्दूल ठाकूर याला लखनऊ सुपर जाएंट्स च्या ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रॅक्टिस करताना पाहायला मिळाले. येथे तो फ्रँचायझीच्या मुख्य वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत खेळाडूंचा सराव करताना दिसला. या व्यतिरिक्त, होळी समारंभात तो ऋषभ पंत सोबत सुद्धा दिसला. त्यानंतर येत्या आयपीएल सीजनमध्ये तो एलएसजीबरोबर दिसू शकतो असा अंदाज लावला जात आहे. मात्र अद्याप लखनऊ सुपर जाएंट्सकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे शार्दूलला रिप्लेसमेंट म्हणून स्पर्धेत खेळवले जाते की त्याला फक्त नेट गोलंदाज म्हणून संघाशी जोडण्यात आले आहे याची माहिती मिळालेली नाही.
Shardul Thakur
What's going on LSGThis kind of a post for just a Net bowler, I don't think so pic.twitter.com/O45agkBcus
Abin (futbolcricket) March 15, 2025
शार्दूल ठाकूर याने आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स, कोलकाता नाईट रायडर्स अशा अनेक संघांचा भाग राहिला आहे. शार्दूलने 95 आयपीएल सामने खेळले असून यात त्याने 307 धावा आणि 94 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याच्या नावावर एक अर्धशतक सुद्धा आहे.