)
Shreyas Iyer Captain of India A against Australia A: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया ए संघाविरुद्ध सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या मल्टी-डे सामन्यांसाठी श्रेयस अय्यरला भारत ए संघाचा कर्णधार घोषित करण्यात आला आहे. तर युवा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलकडे उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी सलग काही मालिकांतून अय्यरला भारतीय संघात स्थान मिळालं नव्हतं. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तसेच आगामी आशिया कपसाठीही त्याला निवड समितीने डावललं होतं. त्यामुळे त्याच्या सततच्या दुर्लक्षाबद्दल प्रश्नचिन्हं उपस्थित झाली होती. अखेर आता त्याला भारत ए संघाचं नेतृत्व करण्याची मोठी संधी मिळाली आहे.
दरम्यान, स्टार फलंदाज केएल राहुल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे दुसऱ्या सामन्यापासून संघात सामील होणार आहेत.
या संघात अनुभवी खेळाडूंबरोबरच नवोदितांना देखील संधी देण्यात आली आहे. ध्रुव जुरेल उपकर्णधार आणि यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडणार असून, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शन, आयुष बडोनी यांसारख्या युवा फलंदाजांवर जबाबदारी असेल. गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णा व खलील अहमद या जोडीला हर्ष दुबे, तनुश कोटियन व मानव सुथार यांचा साथ मिळणार आहे. ऑलराउंडर नीतीश रेड्डी व लेग स्पिनर गुरनूर बरार हेसुद्धा संघाचा भाग आहेत.
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिमन्यु ईश्वरन, नारायण जगदीसन (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (उपकर्णधार व यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, हर्ष दुबे, आयुष बडोनी, नीतीश कुमार रेड्डी, तनुष कोटियन, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बरार, खलील अहमद, मानव सुथार, यश ठाकुर.
NEWS
— BCCI (@BCCI) September 6, 2025
India A squad for two multi-day matches against Australia A announced.
Details #TeamIndiahttps://t.co/PJI6lWxeEQ pic.twitter.com/2gqZogQKnN
पहिला मल्टी-डे सामना : 16 ते 19 सप्टेंबर 2025, लखनऊ
दुसरा मल्टी-डे सामना : 23 ते 26 सप्टेंबर 2025, लखनऊ
या दोन सामन्यांनंतर भारत ए व ऑस्ट्रेलिया ए यांच्यात तीन वनडे सामने देखील खेळले जाणार आहेत. हे सामने अनुक्रमे 30 सप्टेंबर, 3 ऑक्टोबर व 5 ऑक्टोबर रोजी कानपूर येथे पार पडतील.