Shubman Gill: 2023 मध्ये शुभमनची 'ही' 2 स्वप्नं राहिली अपूर्ण; पोस्ट शेअर करत म्हणाला...!

Shubman Gill Social Media Post: नवीन वर्षाच्या निमित्ताने शुभमन गिलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये काही फोटो आहेत. या फोटोमध्ये एक यादी देखील दिसतेय. जी त्याने 31 डिसेंबर 2022 रोजी तयार केली होती. 

सुरभि जगदीश | Updated: Jan 2, 2024, 10:10 AM IST
Shubman Gill: 2023 मध्ये शुभमनची 'ही' 2 स्वप्नं राहिली अपूर्ण; पोस्ट शेअर करत म्हणाला...! title=

Shubman Gill Social Media Post: 2023 हे वर्ष संपलं आणि 2024 या नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. हे गेलं वर्ष क्रिकेटच्या दृष्टीने टीम इंडियासाठी फारसं चांगलं गेलेलं नाही. अशातच टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिलसाठी मात्र हे वर्ष वनडे आणि आयपीएलच्या दृष्टीने उत्तम गेल्याचं दिसून आलं. आयपीएलमध्ये सर्वाधिक रन्स करून ऑरेंज कॅप जिंकणारा तो खेळाडू ठरला. तर वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही तो या वर्षी बनला.

दरम्यान नवीन वर्षाच्या निमित्ताने शुभमन गिलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये काही फोटो आहेत. या फोटोमध्ये एक यादी देखील दिसतेय. जी त्याने 31 डिसेंबर 2022 रोजी तयार केली होती. 

शुभमनने शेअर केली लिस्ट

2023 वर्षासाठी गिलची टू-डू यादी फार रंजक आहे. ही लिस्ट त्याने शेअर केली आहे. ही लिस्ट त्याने स्वतःच्या हाती लिहीली असून त्याला 2023 मध्ये भारतासाठी सर्वाधिक शतकं झळकावायची होती, ऑरेंज कॅप जिंकायची होती आणि त्याच्या टीमसह विश्वचषक ट्रॉफी जिंकायची होती. 'माझ्या कुटुंबाला आनंदी बनवा' आणि 'स्वतःसाठी कमी कठोर व्हा' या गोष्टींचा देखील या यादीत समाविष्ट आहे. 

यावेळी ठरवलेले दोन लक्ष्य तो गाठू शकला नाही. गिलने यंदाच्या वर्षी 7 शतकं ठोकली. मात्र ही शकतं  कोहलीपेक्षा कमी आहे. आणि दुसरी गोष्ट अर्थात त्याला वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न देखील पूर्ण करता आलं नाही.

कॅप्शनमध्ये काय म्हणाला शुभमन?

पोस्ट शेअर करताना शुभमन गिलने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "2023 च्या अखेरीस, हे वर्ष अनुभवांनी भरलेलं आहे, काही मस्त मजेशीर क्षण आणि अनेक मला धडा शिकवून गेले. ठरल्याप्रमाणे वर्ष संपलं नाही, पण मी अभिमानाने सांगू शकतो की, आम्ही आमच्या ध्येयाच्या इतक्या जवळ आलो. येणारं वर्ष स्वतःची आव्हानं आणि संधी घेऊन येणार आहे. आशा आहे की, 2024 मध्ये आम्ही आमच्या लक्ष्याच्या जवळ जाऊ."

टेस्ट टीममध्ये शुभमनचं सिलेक्शन

टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून टेस्ट टीममध्ये शुभमन गिलचा समावेश करण्यात आला आहे. मात्र पहिल्या सामन्यात त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. या सामन्यातील पहिल्या डावात 2 रन्स तर दुसऱ्या डावात केवळ 26 रन्स त्याला करता आले. 3 जानेवारीपासून भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरी टेस्ट सुरु होणार असून गिलच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.