)
IND VS AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 19 ऑक्टोबर पासून वनडे सीरिजला सुरुवात झाली. पहिला सामना पर्थ स्टेडियमवर खेळवण्यात आला. मात्र या सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेट्सने पराभव झाला असून ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचे खेळाडू या सामन्यात बऱ्याच अंशी फ्लॉप ठरले. पावसामुळे प्रभावित झालेल्या पर्थ सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल खूपच निराश दिसत होता.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यावर शुभमन गिलने पाऊस आणि खराब फलंदाजी ही भारताच्या पराभवाची कारण ठरली असं म्हटलं आहे. कर्णधार गिल म्हणाला की, 'जेव्हा तुम्ही पॉवरप्लेमध्ये तीन टॉप-ऑर्डर विकेट गमावता तेव्हा पुनरागमन करणे कठीण असते. पावसाचा विलंब आणि खराब सुरुवात असूनही, आम्ही या सामन्यातून बरेच काही शिकलो आहोत आणि अनेक सकारात्मक गोष्टी घेतल्या आहेत'.
DLS मेथडमुळे ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या टार्गेटमध्ये बदल झाला आणि त्यांना २६ ओव्हरमध्ये 131 धावांचं टार्गेट मिळालं. यावर शुभमन गिल म्हणाला की, 'आम्हाला २६ ओव्हरमध्ये फक्त १३० धावांचा बचाव करायचा होता. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले, पण निकाल आमच्या मनासारखा गेला नाही. आम्ही सामना खूप जवळपर्यंत खेचू शकलो. आम्हाला याबद्दल खूप समाधान आहे. पर्थमध्ये आम्हाला पाठिंबा देण्यासाठी इतका मोठा चाहता वर्ग मिळाल्याबद्दल आम्ही खूप भाग्यवान आहोत. मला आशा आहे की आम्हाला एडिलेड मध्येही असाच पाठिंबा मिळेल'.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला त्यामुळे टीम इंडियाला फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. पावसाच्या अडथळ्यामुळे 50 ओव्हरचा वनडे सामना हा अवघ्या 26 ओव्हरचा करण्यात आला. टीम इंडियाने 26 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 136 धावा केल्या. 8 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारे टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी समोर फ्लॉप ठरले. रोहित शर्माचा हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. मात्र यात तो केवळ 8 धावा करून बाद झाला तर विराट कोहली तर धावांचं खात न उघडताच बाद झाला. टीम इंडियातील इतर फलंदाज सुद्धा समाधानकारक कामगिरी करू शकले नाहीत. सर्वाधिक धावा केएल राहुल (38) ने केल्या. पुढे पावसामुळे अडथळा आल्याने DLS मेथडमुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 137 ऐवजी 131 धावांचं आव्हान देण्यात आलं. हे आव्हान त्यांनी 7 विकेट राखून पूर्ण केलं. टीम इंडियाने गोलंदाज फक्त 3 विकेट घेऊ शकले.
पहिला वनडे सामना कधी आणि कुठे खेळला गेला?
उत्तर: पहिला वनडे सामना १९ ऑक्टोबर २०२५ रोजी पर्थ स्टेडियमवर खेळला गेला. ही तीन सामन्यांची सीरिजची सुरुवात होती.
ऑस्ट्रेलियाने विजय कसा मिळवला?
उत्तर: ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. त्यांनी DLS नुसार १३१ धावांचे लक्ष्य ७ विकेट राखून पूर्ण केले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केवळ ३ विकेट घेतल्या.
शुभमन गिलने पराभवाची जबाबदारी कोणावर टाकली?
उत्तर: शुभमन गिलने पावसाचा विलंब आणि खराब फलंदाजीला (विशेषतः पॉवरप्लेमध्ये तीन टॉप-ऑर्डर विकेट गमावणे) भारताच्या पराभवाची मुख्य कारणे म्हटली. त्यांनी सांगितले की, 'जेव्हा तुम्ही पॉवरप्लेमध्ये तीन टॉप-ऑर्डर विकेट गमावता तेव्हा पुनरागमन करणे कठीण असते. पावसाचा विलंब आणि खराब सुरुवात असूनही, आम्ही या सामन्यातून बरेच काही शिकलो आहोत आणि अनेक सकारात्मक गोष्टी घेतल्या आहेत.'