Smriti Mandhana And Palash Muchhal Wedding Card : भारतीय महिला चॅम्पियन संघाची उपकर्णधार आणि स्टार फलंदाज स्मृती मंधाना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. बॉलिवूडमधील म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल सोबत विवाह करणार आहे. पलाश हा प्रसिद्ध गायक पलक मुच्छलचा लहान भाऊ आहे. मागील जवळपास 5 वर्षांपासून स्मृती आणि पलाश एकमेकांना डेट करतायत. अशातच काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा देखील सुरु होत्या. अशातच आता दोघांच्या लग्नाची पत्रिका समोर आलीये.
स्मृती आणि पलाशचा लग्नसोहळा नोव्हेंबर महिन्यात पार पडणार होता अशी चर्चा होती. आता समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार 20 नोव्हेंबर रोजी दोघांचा विवाह होणार आहे. स्मृती मंधाना ही मूळची सांगलीची आहे. तर पलाश हा इंदोरचा राहणार आहे. लग्न समारंभाची सुरुवात ही स्मृतीच्या गावी सांगली येथून होईल. सांगलीत पारंपरिक पद्धतीने लग्नाचे विधी पार पडतील, तर नंतर दोघे इंदौरमध्ये रिसेप्शन देणार आहेत. या लग्नानंतर स्मृती अधिकृतरीत्या इंदौरची सूनबाई होईल. कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत लग्न पारंपरिक रीतिरिवाजांनी साजरे होणार आहे.
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांची भेट 2019 साली झाली होती आणि त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री आणि जवळीक निर्माण झाली. पाच वर्षांच्या रिलेशननंतर, गेल्या जुलै महिन्यात दोघांनी सोशल मीडियावर आपला संबंध जाहीर केला. त्याचवेळी त्यांनी 'लवकरच लग्न करणार' असंही सांगितलं होतं.
स्मृती आणि पलाशच्या लग्नाच्या चर्चांदरम्यान, पलाशची बहीण आणि प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल हिनेही स्मृतीबद्दल खास प्रतिक्रिया दिली होती. तिने एका मुलाखतीत सांगितलं की, 'स्मृती आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग झाली आहे. तिचं व्यक्तिमत्त्व अप्रतिम आहे आणि आमचं नातं केवळ वहिनी-भावजयीचं नाही, तर जवळच्या मैत्रिणींसारखं आहे'.
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल या दोघांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही पत्रिका खूपच रॉयल आहे. पत्रिकेच्या वरच्या भागात स्मृती आणि पलाश यांचा क्रिएटिव्ह फोटो आहे. यात स्मृतीच्या हातात बॅट तर पलाशच्या हातात गिटार दिसतेय.
स्मृती मंधानाचा होणारा नवरा कोण आहे?
पलाश मुच्छल हा बॉलिवूडमधील म्युझिक कंपोझर आणि प्रसिद्ध गायक पलक मुच्छलचा लहान भाऊ आहे.
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल कधी लग्न करणार आहेत?
मीडिया रिपोर्ट्सनुसार स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल 20 नोव्हेंबर 2025 रोजी लग्न करणार आहेत.
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल किती वर्षांपासून डेट करतायत?
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल 5 वर्षांपासून डेट करतायत.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.