Palash Muchhal Breaks Silence On Rs 40 Lakh Sangli Fraud Allegation: गेल्या काही दिवसात शांत झालेल्या चर्चांना आता पुन्हा उधाण आलं आहे. ही चर्चा पलाश मुच्छलची आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिचा माजी होणारा पती म्हणून ओळखला जाणारा गायक आणि चित्रपट दिग्दर्शक पलाश मुच्छल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. स्मृतीसोबत लग्न मोडल्यापासून त्यावर अनेक आरोप केले जात आहेत. त्याच्यावर स्मृतीला फसवल्याचं आरोप केला आहे. आता त्यावर अजून एक आरोप लावण्यात आला आहे. स्मृती मंधानाच्या एका मित्राने पलाशवर तब्बल 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. विज्ञान मानेनावाच्या व्यक्तीने पलाश मुच्छलवर आरोप केला आहे की, त्याच्याकडून एका चित्रपटासाठी मोठी रक्कम घेतल्यानंतर ती परत करण्यात आलेली नाही.
या आरोपांनंतर पलाश मुच्छलने मौन सोडत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली असून, सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत.
स्मृतीचा मित्र विज्ञान मानेच्या तक्रारीनुसार, स्मृती मंधानाचे वडील यांनीच आपली ओळख पलाश मुच्छलशी करून दिल्याचा दावा माने याने केला आहे. त्यानंतर पलाशने ‘नजरिया’ नावाच्या चित्रपटात गुंतवणूक करण्यासाठी त्याला तयार केले. चित्रपटाच्या निर्मितीसाठी माने याने सुमारे 40 लाख रुपये दिले, मात्र चित्रपट पूर्ण झाला नाही. पैसे परत मागितल्यानंतर सुरुवातीला आश्वासन देण्यात आले, पण नंतर फोन उचलणे बंद करण्यात आले आणि सर्व संपर्क माध्यमांवरून ब्लॉक केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
हे ही वाचा: 'पलाशला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडले...' स्मृती मंधानाच्या बालमित्राचा दावा; 40 लाखांच्या फसवणुकीची तक्रारही दाखल
हे आरोप सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हायरल झाल्यानंतर पलाश मुच्छलने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे प्रतिक्रिया दिली. या सर्व आरोपांवर पलाश मुच्छल याने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळले आहेत. “सांगलीतील विज्ञान माने यांनी केलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन आहेत. माझी प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने हे आरोप केले जात आहेत. माझे वकील श्रेयांश मितारे या प्रकरणाकडे लक्ष देत असून, आम्ही कायदेशीर मार्गाने याला योग्य उत्तर देणार आहोत,” असे पलाशने स्पष्ट केले.

या प्रकरणामुळे स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबतही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात दोघांचे लग्न होणार होते आणि त्या अनुषंगाने विधीही सुरू झाले होते. मात्र, त्याच काळात मंधानाच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांनंतर अधिकृत निवेदनाद्वारे लग्न रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल हे सुमारे सहा वर्षे एकमेकांसोबत होते. मात्र लग्न रद्द झाल्यानंतर आणि आता समोर आलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
IND-A
(20 ov) 197/8
|
VS |
NAM
67(12.1 ov)
|
| India A beat Namibia by 130 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
ITA
(20 ov) 193/7
|
VS |
UAE
81(18.2 ov)
|
| Italy beat United Arab Emirates by 112 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
(20 ov) 208/7
|
VS |
USA
201/8(20 ov)
|
| New Zealand beat USA by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.