नवी दिल्ली :  भारत -न्यूझीलंड टी-२० आणि श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. यात एका खेळाडूने भारतीय संघात पुनरागमन झाले. त्याचे नाव केएल राहुल.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडच्या वन डे सिरीजमध्ये बाहेर ठेवलेल्या के एल राहुल याला पुन्हा संघात घेण्याचा सल्ला माजी कर्णधार सौरभ गांगुली याने दिला होता. त्यामुळे त्याला न्यूझीलंड विरूद्धच्या टी-२० आणि श्रीलंकेविरूद्धच्या टेस्ट सिरीजसाठी सिलेक्टरने निवडले आहे. 


गांगुलीने सिलेक्टरला के एल राहुलवरही लक्ष देण्यास सांगितले होते. तो म्हटला होता की सध्याच्या परिस्थितीत राहुलला टीमच्या बाहेर ठेवले जाऊ शकत नाही. तो सातत्याने धावा काढत आहे. ऑस्ट्रेलिया असो, श्रीलंका असो वा वेस्ट इंडिज त्याने धावा काढल्या आहेत. त्यामुळे जितक्या लवकर होईल त्याला संघात घ्यायला पाहिजे. त्याचा रेकॉर्ड आणि क्वालिटी खूप शानदार असल्याचे एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सौरभ गांगुलीने म्हटले आहे. 


सध्या के एल राहुलच्या ऐवजी न्यूझीलंड सिरीजमध्ये दिनेश कार्तिक याला टीममध्ये सामील करण्यात आले. राहुल ओपनर असल्याने मीडल ऑर्डरला फलंदाजी करू शकत नाही. श्रीलंकेत त्याला टीम मॅनेजमेंटने चार संधी दिल्या. पण तो अयशस्वी ठरला. त्यामुळे दिनेश कार्तिकाला स्थान देण्यात आले. 


टीम इंडियाची घोषणा 


श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय.या सीरिजसाठी मोहम्मद शमी आणि मुरली विजयचं कमबॅक झालंय.


या टीममध्ये मोहम्मद शमी आणि मुरली विजयचं कमबॅक झालंय. तर अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची धुरा देण्यात आलीय. 


श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसह न्यूझीलंडवरुद्धच्या टी-20साठीही टीम जाहीर करण्यात आली आहे. या टीममध्ये मुंबईकर श्रेयस अय्यर हा नवा चेहरा आहे. 


श्रीलंका सीरिजमधील सामन्यांना 16 नोव्हेंबरपासून सुरुवात होतेय. 16 नोव्हेंबरला ईडन गार्डनवर पहिला सामना रंगणार आहे. त्यानंतर 24 नोव्हेंबरला नागपूर आणि 2 डिसेंबरला दिल्लीमध्ये सामना रंगणार आहे. 


श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघ 


विराट कोहली, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, मुरली विजय, रोहित शर्मा, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमन साहा, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, हार्दिक पांड्या, उमेश यादव


न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांसाठी भारतीय संघ


विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नहेरा, मोहम्मद सिराज