दिल्लीचं जवाहरलाल नेहरू स्टेडियम होणार जमीनदोस्त, क्रीडा मंत्रालयाने का घेतला असा निर्णय?

दिल्लीतील प्रसिद्ध जवाहर लाल नेहरू स्टेडियम जमीनदोस्त करण्याची योजना क्रीडा मंत्रालयाकडून बनवली जातं आहे.  हे स्टेडियम अनेक आंतरराष्ट्रीय सामने आणि क्रीडा स्पर्धांचं साक्षीदार आहे. 

पूजा पवार | Updated: Nov 10, 2025, 04:35 PM IST
दिल्लीचं जवाहरलाल नेहरू स्टेडियम होणार जमीनदोस्त, क्रीडा मंत्रालयाने का घेतला असा निर्णय?
(Photo Credit : Social Media)

Jawaharlal Nehru Stadium Delhi : दिल्लीतील सर्वात जुन्या स्टेडियमपैकी एक असणारं जवाहर लाल नेहरू स्टेडियम जमीनदोस्त करण्याची योजना क्रीडा मंत्रालयाकडून बनवली जातं आहे. क्रीडा मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडून तिथे 'स्पोर्ट्स सिटी' बनवली जाणार आहे. हा प्रोजेक्ट 102 एकरच्या मोठ्या क्षेत्रात पसरलेला असेल. या नव्या स्पोर्ट्स सिटीच्या निर्माणासाठी कतार आणि ऑस्ट्रेलिया सारख्या शहरांमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या आधुनिक खेळ मॉडलचं आकलन केलं जाईल. या प्रकल्पाचे उद्दिष्ट दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण करणे आहे.

Add Zee News as a Preferred Source

सूत्रांच्या माहितीनुसार सध्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम ज्या जमिनीवर बनलं आहे त्याला पूर्णपणे विकसित केलं जाईल. नवी स्पोर्ट्स सिटी 102 एकरावर पसरली असेल यामुळे ते देशातील प्रमुख क्रीडा सुविधांपैकी एक बनेल. या प्रकल्पाचे उद्दिष्ट क्रीडा क्षेत्रासाठी समर्पित एकात्मिक आणि आधुनिक केंद्र स्थापन करणे आहे.

आंतरराष्ट्रीय मॉडलवर बनणार स्पोर्ट्स सिटी : 

नव्या स्पोर्ट्स सिटीला जगातील सर्वोत्तम बनण्यासाठी खेळ मंत्रालयाच्या टीम कतार आणि ऑस्ट्रेलियामधील यशस्वी क्रीडा मॉडेल्सचा बारकाईने अभ्यास करत आहेत. या आंतरराष्ट्रीय मॉडेल्समधून शिकून डिझाइन आणि सुविधा अंतिम करण्यासाठी वापरल्या जातील.

कधी बनलं होतं स्टेडियम?

जवाहरलाल नेहरू स्टेडियमला 1982 च्या एशियन गेम्ससाठी बनवण्यात आलं होतं. त्यानंतर 2010 च्या कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनासाठी याला रिनोव्हेट करण्यात आलं. हे स्टेडियम भारतासाठी बऱ्याच काळापासून सर्वात प्रसिद्ध बहु-क्रीडा स्थळांपैकी एक राहीलं. जवळपास 60 हजार लोकांची कपॅसिटी असणाऱ्या या स्टेडियममध्ये मोठे एथलेटिक्स इवेंट, फुटबॉल सामने, मोठे कॉन्सर्ट आणि अनेक राष्ट्रीय कार्यक्रम झाले. यात स्वतंत्रता दिवसाच्या कार्यक्रमाचा सुद्धा समावेश आहे. हे स्टेडियम ऐतिहासिकदृष्ट्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स संघाचे होम व्हेन्यू राहिले आहे आणि चार दशकांहून अधिक काळ भारताच्या क्रीडा इतिहासात त्याचे महत्त्वाचे स्थान आहे.

FAQ : 

जवाहरलाल नेहरू स्टेडियम काय आहे?
जवाहरलाल नेहरू स्टेडियम हे दिल्लीतील एक प्रमुख स्टेडियम आहे जे 1982 च्या एशियन गेम्ससाठी बनवले गेले होते.

जवाहरलाल नेहरू स्टेडियम का तोडले जाणार आहे?
जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडून तिथे एक नवीन स्पोर्ट्स सिटी बनवली जाणार आहे.

स्पोर्ट्स सिटीचे डिझाइन कोणत्या मॉडेल्सवर आधारित असेल?
स्पोर्ट्स सिटीचे डिझाइन कतार आणि ऑस्ट्रेलियामधील यशस्वी क्रीडा मॉडेल्सवर आधारित असेल.

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More