कोलंबो : श्रीलंका क्रिकेटने आपल्या राष्ट्रीय संघाच्या व्यवस्थापकाला नवोदित खेळाडू आणि वैद्यकीय कर्मचार्‍यातील एका महिला सदस्यावर लैंगिक गैरवर्तन केल्याच्या आरोपाविषयी अहवाल देण्यास सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंका क्रिकेट तेव्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते जेव्हा स्थानिक मीडियात एक गोलंदाज एका महिलेसोबत असल्याच्या बातम्या समोर आल्या. 


श्रीलंका क्रिकेटने म्हटले आहे की, असे बर्‍याच माध्यमांचे वृत्त आहे की सध्या इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळणार्‍या संघाच्या सदस्याने वैद्यकीय कर्मचारीवर गैरवर्तन केल्याचं समजतं आहे. 


श्रीलंका क्रिकेटने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 'या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही टीम मॅनेजर असांथा डी मेल यांना या घटनेचा अहवाल देण्यास सांगितले आहे. जेणेकरुन माध्यमांच्या वृत्तांच्या सत्यतेची पुष्टी करता येईल'.


श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून सुरू होणार आहे. संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी बुधवारी सांगितले की असं घडणं शक्य नाही कारण सर्व खेळाडू बायो बबलमध्ये राहत आहेत.