कोलंबो : क्रिकेट खेळताना धावण्याला खूप महत्त्व आहे, एक तर बॅटिंग करताना, रनआऊट होण्याचा धोका कमी होतो, आणि फिल्डिंगला असताना, रन अडवता येतात, तसेच कॅच सहज हातात येतात. म्हणून क्रिकेटर्सना धावण्याचं महत्त्व पटवून दिलं जात आहे, आणि त्यांच्याकडून ८ मिनिटात ठराविक अंतर पार न केल्यास त्यांना पगार कपातीचा इशारा देण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा नियम अजून टीम इंडियात लागू झालेला नसला, तरी श्रीलंकन टीमला हा नियम लागू झाला आहे. निश्चितच श्रीलंकन टीमच्या कामगिरीवर याचा चांगला परिणाम दिसून येणार आहे.


आता जे क्रिकेटर्स जर कमी स्टॅमिनाने धावतील त्याचा थेट परिणाम त्यांच्या पगारावर होणार आहे. तुम्हाला ही गोष्ट थोडी खटकेल मात्र हे खरं आहे. क्रिकेट आता पूर्णपणे बदललं आहे आणि या खेळात आता फिटनेसला अधिक महत्त्व देण्यात येणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने यासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


यानुसार आता खेळाडूंना यो-यो टेस्ट द्यावी लागणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने येत्या नवीन वर्षापासून सर्व क्रिकेटपटूंसाठी फिटनेसचं नवे मापदंड निश्चित करण्यात आले आहेत.


बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर कोणता खेळाडू फीट नसेल तर त्याचा पगारही कापला जाऊ शकतो. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केल्यानुसार, जो खेळाडू 8 मिनिटं आणि ३५ सेकंद, ते 8 मिनिटं आणि 10 सेकंदात 2 किलोमीटर धावू शकतो, तर त्याचा पगार कॉन्ट्रॅक्टप्रमाणे ठरवण्यात आला आहे. ज्यामध्ये कपात होण्याचीही शक्यता आहे.


श्रीलंका क्रिकेट बोर्डाने यो-यो टेस्टमध्ये 2 किलोमीटरच्या निश्चित करण्यात आलं आहे. यामध्ये जर कोणी 5 मिनिटं 88 सेकंदापेक्षा जास्त वेळ घेईल त्याचं टीममध्ये सिलेक्शन होणार नाही.


अशातच एखाद्या खेळाडूला 2 किलोमीटरसाठी 8 मिनिटं आणि 10 सेकंदापेक्षा कमी वेळ लागल्यास त्याची टीममध्ये निवड केली जाईल. टीममध्ये निवड होण्यासाठी हा नवा निकष असणार आहे. पहिली फिटनेस टेस्ट 7 जानेवारीला होणार असून यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये असलेल्या सर्व खेळाडूंना सहभागी व्हावं लागणार आहे. याशिवाय महिन्यात कधीही रँडम टेस्टिंग केलं जाऊ शकतं.


श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिग्गज खेळाडू महेला जयवर्धने यांना टीमचा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावणारे महेला जयवर्धने सध्या देशाच्या टीममध्ये महत्त्वाचे बदल करण्याची शक्यता आहे.


टीम इंडियामध्ये ज्यावेळी महेंद्रसिंग धोनी कर्णधार होत्या त्याचवेळी यो-यो होत होत्या. त्यानंतर विराट कोहलीच्या येण्याने टीम इंडियाचं फीटनेस आणि फिल्डींग अधिक चांगलं झाल्याचं समोर आलंय.