Suhail Sattar And Yahya Suhail : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका बाप लेकाच्या जोडीने एकत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच झालं की जेव्हा बाप लेकाच्या जोडीने एकाच सामन्यात आणि एकाच संघाकडून पदार्पण केलं असेल. तिमोर लेस्तेचे 50 वर्षांचे सुहैल सत्तार आणि 17 वर्षांचा मुलगा सुहैल आंतरराष्ट्रीय सामन्यात एकत्र खेळणारी बाप लेकाची एकमेव जोडी बनली आहे. त्यांनी 6 नोव्हेंबर रोजी बालीमध्ये इंडोनेशिया विरुद्ध तिमोर-लेस्तेच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात ही कामगिरी केली आहे. या सामन्यात दोघांनी एकत्र फलंदाजी सुद्धा केली. या बाप लेकाच्या जोडीचं पदार्पण टी20 ट्राय सीरिजमध्ये झालं.
सुहैल सत्तार यांचा 17 वर्षांचा मुलगा याह्या सुहैल याने एवढ्या कमी वयात संघात स्थान मिळवले आहे. मात्र या बाप लेकाच्या जोडीचा पदार्पण सामना खास ठरला नाही कारण तो पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात फ्लॉप ठरला. सुहैल सत्तार 15 बॉलमध्ये 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर मुलगा याह्या सुहैल हा फक्त 6 धावा करून बाद झाला. सत्तारने एका ओव्हरमध्ये गोलंदाजी सुद्धा केली पण यात त्याला यश मिळालं नाही. या वर्षी, मॅटी फर्नांडिस आणि त्यांची मुलगी नीना मॅटी यांनी स्विस महिला संघासाठी सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळले. पुरुष क्रिकेटमध्ये वडील आणि मुलगा एकाच संघासाठी एकत्र खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये बाप लेकाची जोडी अनेकदा एकमेकांविरुद्ध खेळली आहे. वेस्ट इंडिजचा शिवनारायण चंद्रपॉल आणि त्याचा मुलगा टेगनारिन चंद्रपॉल यांनी गुयानासाठी 11 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. मार्च 2014 मध्ये प्रोव्हिडन्स स्टेडियमवर विंडवर्ड आयलंडविरुद्धच्या सामन्यात शिवनारायणने आपल्या मुलाच्या संघाचे नेतृत्वही केले. यावर्षी अलिकडेच, श्पागेझा क्रिकेट लीगच्या अंतिम सामन्यात, अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी त्याचा मुलगा हसन इश्खिल विरुद्ध खेळला.
हेही वाचा : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, दक्षिण आफ्रिका टेस्ट सीरिजपूर्वी स्टार खेळाडूला दुखापत
तिमोर-लेस्ते संघाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवात खराब झाली. त्यांना पहिल्या तीन सामन्यात प्रत्येकी 10-10 क्रिकेटने पराभव पत्करावा लागला. तसेच इंडोनेशियाविरुद्धचा सामनाही त्यांना 10 विकेट्सने गमावावा लागला.
तिमोर-लेस्ते संघाचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना कसा झाला?
तिमोर-लेस्ते संघाचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खराब झाला, त्यांना इंडोनेशियाविरुद्ध 10 विकेट्सने पराभव पत्करावा लागला.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये बाप लेकाची जोडी एकत्र खेळली आहे का?
हो, देशांतर्गत क्रिकेटमध्ये बाप लेकाची जोडी एकत्र खेळली आहे, जसे की शिवनारायण चंद्रपॉल आणि त्याचा मुलगा टेगनारिन चंद्रपॉल.
बाप लेकाच्या जोडीने एकत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे पहिले खेळाडू कोण आहेत?
सुहैल सत्तार आणि त्यांचा मुलगा याह्या सुहैल हे बाप लेकाच्या जोडीने एकत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे पहिले खेळाडू आहेत.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.