Sunil Gavaskar on Anderson-Tendulkar Trophy Name: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला अलीकडेच एक नवीन ओळख देण्यात आली आहे. यापुढे ही प्रतिष्ठेची मालिका "अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी" या नावाने ओळखली जाणार आहे. इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोन दिगज्जांच्या नावावरून या ट्रॉफीचे नाव ठेवण्यात आले आहे. या आधी त्याचे नाव पतौडी ट्रॉफ असे होते. नाव बदल्यापासूनच अनेक वाद होत आहेत. मात्र, या नावामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. हा वाद सुनील गावस्कर यांनी त्यांचं मत मांडल्यावर सुरु करण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी नावावरुन थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, ट्रॉफीचे नाव तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी असायला हवे होते. याचे कारण तेंडुलकरचे क्रिकेटमधील योगदान आणि वरिष्ठता यामुळे त्याचं नाव आधी यायला हवं. गावस्कर यांनी ‘मिड-डे’ या वृत्तपत्रातील आपल्या स्तंभात यावर स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
गावस्कर म्हणतात, “इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) ट्रॉफीचे नाव देण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण भारतीय चाहत्यांच्या दृष्टीने हे नाव धक्कादायक आहे. तेंडुलकर हे केवळ अँडरसनपेक्षा 12 वर्षांनी मोठे नाहीत, तर त्यांनी क्रिकेटमध्ये केलेली कामगिरी देखील मोठी आहे. कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही फॉरमॅटमध्ये त्यांनी विक्रम प्रस्थापित केले आहेत.”
गावस्कर पुढे लिहितात, “हो, अँडरसन हा कसोटीतील सर्वोच्च विकेट घेणाऱ्यांपैकी एक आहे, पण तो मुख्यतः घरच्या मैदानांवर प्रभावी ठरला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड तेंडुलकरच्या तुलनेत काहीच नाही. तेंडुलकर हा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता, जे अँडरसनला साध्य करता आलं नाही.”
या सर्व प्रकरणावर भाष्य करत गावस्कर यांनी शेवटी स्पष्टपणे म्हटलं की, “मी भारतीय मीडिया आणि क्रिकेटप्रेमींना विनंती करतो की त्यांनी या मालिकेला तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी असंच संबोधावं.”
MAW
(20 ov) 109/9
|
VS |
BRN
111/3(14.4 ov)
|
Bahrain beat Malawi by 7 wickets | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 135/9
|
VS |
GER
137/6(18 ov)
|
Germany beat Tanzania by 4 wickets | ||
Full Scorecard → |
BRN
(20 ov) 207/2
|
VS |
GER
161/8(20 ov)
|
Bahrain beat Germany by 46 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.