)
IND VS SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात बुधवार 3 डिसेंबर रोजी वनडे सीरिजमधला दुसरा सामना खेळवला जातोय. रायपूरच्या स्टेडियमवर हा सामना सुरु असून यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) लागोपाठ दुसऱ्या सामन्यात शतक ठोकलं. यापूर्वी विराटने रांची येथील सामन्यात सुद्धा शतकीय कामगिरी केली होती. विराटने बुधवारी रायपूरमध्ये ठोकलेलं हे शतक त्याचं वनडे क्रिकेटमधील 53 वं शतक ठरलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटचं हे 84 वं शतक ठरलं. या शतकानंतर दिग्गज क्रिकेटर सुनील गावसकर यांनी विराट कोहलीला सुपरमॅनची उपमा दिली.
रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या सीरिजमधला दुसरा सामना आयोजित करण्यात आला. या सामन्याचा टॉस दक्षिण आफ्रिकेने जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला भारताला फलंदाजीचं आव्हान दिलं. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा हे सलामी फलंदाज फार काळ मैदानावर टिकू शकले नाही. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडने दमदार फलंदाजी केली. यात आधी ऋतुराज गायकवाडने शतक ठोकलं. त्यानंतर विराट कोहलीने शतक पूर्ण केलं. विराटने 93 बॉलमध्ये 102 धावा केल्या. दरम्यान त्याने 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले. जबरदस्त फॉर्मात असलेल्या विराटची चर्चा सध्या जगभरात होतेय. आता विराटची नजर ही 2027 वनडे वर्ल्ड कप खेळण्यावर आहे. विराट सध्या टी20 आणि टेस्ट सामन्यातून निवृत्ती घेऊनफक्त वनडे फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळतोय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन शतकं झळकावून विराटने आपला जबरदस्त फॉर्म दाखवलाय.
विराट कोहलीने लागोपाठ त्याचं भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दुसऱ्यांदा शतक पूर्ण केलं तेव्हा दिग्गज क्रिकेटर सुनील गावसकर हे इंग्रजी कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित होते. विराटचं शतक पूर्ण झाल्यावर ते म्हणाले की, 'जेव्हा तुमच्याकडे विराट कोहली आहे मग सुपरमॅनची काय गरज?'
यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (कर्णधार), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्ण
क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम, टेंबा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रेट्झके, टोनी डी झोर्झी, देवाल्ड ब्रेव्हिस, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लुंगी न्गिडी
FAQ :
विराट कोहलीने कितीवे शतक ठोकले?
विराट कोहलीने त्याचे 53वे वनडे शतक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 84वे शतक ठोकले.
विराट कोहली सध्या कोणत्या फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळतोय?
विराट कोहली सध्या फक्त वनडे फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळतोय.
विराट कोहलीने किती धावा केल्या?
विराट कोहलीने 102 धावा केल्या.