मुंबई: IPL सुरू होण्याआधीच राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे. संघातला स्टार खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांना उपस्थित नसणार आहे. इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या हाताला दुखापत झाली होती. नुकतंच त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या हातातून काचेचा तुकडा शस्त्रक्रियेदरम्यान काढण्यात आला आहे. आर्चर भारत विरुद्ध इंग्लंड पार पडलेल्या कसोटी आणि टी 20 सीरिजनंतर इंग्लंडला परतले होते. सध्या मिळालेल्या माहितीनुसार जोफ्रा आर्चर सुरुवातीचे IPLमधील सामने खेळू शकणार नसल्यानं राजस्थान रॉयल्स संघाचं टेन्शन चांगलंच वाढलं आहे. 


दुसरीकडे जोफ्रा आर्चर IPLपासून दूर राहणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. त्याला किती दिवस मैदानापासून दूर राहावं लागणार हे पाहाणंही महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वजण जोफ्रा लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. 


जानेवारी महिन्यात जोफ्रा फिश टँकची साफसफाई करत असताना त्याच्या हाताला मार लागला. त्यानंतर भारत दौऱ्यादरम्यान त्याच्या हाताला झालेल्या दुखापतीचा त्रास वाढल्यानं तो पुन्हा इंग्लंडला गेला. जोफ्राच्या हाताची सर्जरी यशस्वीपणे झाली आहे. सध्या त्याच्या तब्येतीकडे डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून आहे.