T-20 कर्णधार सूर्यकुमार यादवने दक्षिण अफ्रिकेच्या कर्णधाराकडे मागितली मदत, कारण थक्क करणारं

Suryakumar Yadav: भारताचा अव्वल फलंदाज आणि टी 20 सामन्यांचा कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकादा चर्चेत आला आहे. अलीकडील त्याच्या एका मुलाखतीत त्याने उघड केले की त्याने दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सची मदत मागितली.   

Updated: Nov 6, 2025, 11:52 AM IST
T-20 कर्णधार सूर्यकुमार यादवने दक्षिण अफ्रिकेच्या कर्णधाराकडे मागितली मदत, कारण थक्क करणारं
(photo credit - Social Media)

Suryakumar Yadav Updates:  भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव हा त्याच्या दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. सध्या त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 सीरीज खेळण्यात व्यस्त आहे. सूर्या हा टी-20 कर्णधार असला तरी त्याला एका गोष्टीची खंत आहे. ही खंत दूर करण्यासाठी त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी महान खेळाडू एबी डिव्हिलियर्सची मदत घेतली आहे. सूर्यकुमार यादवने एका मुलाखतीदरम्यान हा मोठा खुलासा केला असून हे कळताच चाहते चकीत झाले.

Add Zee News as a Preferred Source

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
सूर्यकुमार यादवने भारताच्या सर्वात आघाडीच्या टी-२० फलंदाजांपैकी असून त्याने कित्येक क्रिकेट साामन्यांमध्ये दर्जेदार कामगिरी केली आहे.  पण तो स्वतःच मान्य करतो की त्याने अद्याप एकदिवसीय संघात त्याला स्थान मिळवता आलेले नाही. भारतीय टी-20 कर्णधाराने त्याच्या आव्हानांबद्दल उघडपणे सांगितले आणि दोन्ही फॉरमॅटमध्ये प्रभुत्व कसे मिळवायचे याबद्दल दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्सकडून सल्ला घेण्याची आशा व्यक्त केली.

एका यूट्यूब चॅनलशी संवाद साधताना सूर्यकुमार म्हणाला, की तो अनेकदा टी-20 क्रिकेटसारखी मानसिकता घेऊन एकदिवसीय सामन्यांकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा, पण तो यशस्वी झाला नाही. तो म्हणाला, "जर मी लवकरच एबी डिव्हिलियर्सला भेटलो तर मी त्याला विचारू इच्छितो की तो टी-20 आणि वन डे सामन्यांमध्ये समतोल कसा साधतो? मला वाटायचे की एकदिवसीय सामने टी-20 सारख्या पद्धतीने खेळले जाऊ शकतात."

डिव्हिलियर्सना दिले थेट आवाहन
एबी डिव्हिलियर्सला आवाहन करताना सूर्या म्हणाला, "एबी, जर तुम्ही ऐकत असाल तर कृपया लवकर संपर्क साधा! माझ्यासमोर तीन किंवा चार महत्त्वाची वर्षे आहेत आणि मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये माझा ठसा उमटवण्यास खूप उत्सुक आहे. कृपया मला मदत करा. मी दोन्ही फॉरमॅटमध्ये  नीट समतोल साधू शकत नाही." सूर्यकुमारला फारच कमी वेळा वन डे सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली असून त्याने सूर्यकुमार यादवने आतापर्यंत 35 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 25.76 च्या सरासरीने 736 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या अव्वल खेळाडूंपैकी एक असलेल्या डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेसाठी तब्बल 228 एकदिवसीय सामन्यांमध्ये 9,577 धावा केल्या आहेत. यामध्ये 25 शतके आणि 53 अर्धशतकांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादवने शेवटचा एकदिवसीय सामना दोन वर्षांपूर्वी खेळला होता. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनल सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 18 धावा केल्या होत्या.

About the Author