सूर्यकुमार यादवला टीममधून काढलं बाहेर, 'हा' भारतीय खेळाडू संघाचा नवा कर्णधार

सूर्यकुमार यादव हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया 5 सामन्यांची टी 20 सीरिज खेळणार आहे.   

पूजा पवार | Updated: Oct 11, 2025, 08:46 PM IST
सूर्यकुमार यादवला टीममधून काढलं बाहेर, 'हा' भारतीय खेळाडू संघाचा नवा कर्णधार
(Photo Credit : Social Media)

Suryakumar Yadav : टीम इंडियाचा टी 20 कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) बॅटमधून सध्या हव्या तशा धावा निघत नाहीयेत. आशिया कप 2025 मध्ये भारताने त्याच्या नेतृत्वात विजेतेपद पटकावलं होतं. पण सूर्यकुमार यादव यात चांगल्या धावा करू शकला नाही. आता त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याला देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेलं नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) आगामी रणजी ट्रॉफी सीजनसाठी संघ जाहीर केला असून यात सूर्यकुमार यादवला स्थान देण्यात आलेलं नाही. 

Add Zee News as a Preferred Source

सूर्यकुमारची निवड नाही : 

रणजी ट्रॉफी 2025-26 ला 15 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. यावेळी 42 वेळा रणजी ट्रॉफीचं विजेतेपद पटकावणारा मुंबई संघ त्यांच्या पहिल्या सामन्यात जम्मू आणि काश्मीरशी भिडणार आहे. शुक्रवार, 10 ऑक्टोबर रोजी एमसीएने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली होती परंतु सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादवचे नाव संघात समाविष्ट करण्यात आले नव्हते.

सूत्रांच्या माहितीनुसार सूर्यकुमारला संघातून बाहेर करण्याचं कारण त्याचा सध्याचा खराब फॉर्म आहे. याशिवाय असं सुद्धा म्हणणं आहे की 20 ऑक्टोबरनंतर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे ज्यामुळे त्याला यापूर्वी आराम देण्यासाठी रणजी संघात समाविष्ट करण्यात आलेलं नाही. अनेक तज्ञांचे मत आहे की सूर्याने रणजी सामना खेळायला हवा होता जेणेकरून त्याचा सीरिजपूर्वी सर्व सुद्धा होऊ शकेल. 

शार्दूल ठाकूरकडे सोपवलं कर्णधारपद : 

 मुंबई संघाच्या कर्णधारपदातही मोठा बदल झाला आहे. गेल्या सीजनमध्ये संघाचे नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणेकडे होते. मात्र अजिंक्य रहाणेने काही दिवसांपूर्वीच कर्णधारपदाच्या जबाबदारीतून माघार घेतली. तेव्हा आता एमसीएने शार्दूल ठाकूरकडे कर्णधारपद सोपवलं आहे. रहाणे संघाचा भाग राहील आणि मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करेल.

मुंबईचा संघ : 

शार्दुल ठाकुर (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (विकेटकीपर), अजिंक्य रहाणे, सिद्धेश लाड, शिवम दुबे, सरफराज खान, शम्स मुलानी, तनुष कोटियां, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डिसूजा, हार्दिक टमोरे (विकेटकीपर), इरफान उमैर, मुशीर खान, अखिल हेरवाडकर आणि रॉयस्टन डा.

सूर्यकुमार यादवला मुंबईच्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ संघात का स्थान मिळाले नाही?
उत्तर: सूर्यकुमार यादवचा सध्याचा खराब फॉर्म हा मुख्य कारण आहे. तसेच, २० ऑक्टोबरनंतर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असल्याने त्याला आराम देण्यासाठी संघात समाविष्ट केले गेले नाही. अनेक तज्ञांचे मत आहे की, त्याने रणजी सामन्यांद्वारे फॉर्म परत मिळवावा.

मुंबई रणजी ट्रॉफी संघाची घोषणा कधी झाली आणि त्यात कोणते बदल झाले?
उत्तर: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) १० ऑक्टोबर २०२५ रोजी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली. यात सूर्यकुमार यादवचा समावेश नाही, तर कर्णधारपद शार्दूल ठाकूरकडे सोपवले गेले आहे. अजिंक्य रहाणेने कर्णधारपद सोडले असले तरी तो संघात मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करेल.

सूर्यकुमार यादवचा आशिया कप २०२५ मधील परफॉर्मन्स कसा होता?
उत्तर: आशिया कप २०२५ मध्ये भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात विजेतेपद जिंकले, पण त्याने स्वतः चांगल्या धावा करू शकला नाही. त्याचा खराब फॉर्म सतत चालू आहे, ज्यामुळे आता देशांतर्गत क्रिकेटसाठी निवड झाली नाही.

About the Author