Suryakumar Yadav Excluded from Ranji Trophy Squad: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) वरिष्ठ निवड समितीने जम्मू-काश्मीरविरुद्धच्या पहिल्या रणजी ट्रॉफी सामन्यासाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली. मात्र या यादीत एक नाव न्हवते ते म्हणजे सूर्यकुमार यादव. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या अगोदरच टीम इंडियाचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव मोठ्या संकटात सापडला आहे. त्याला मुंबईच्या रणजी ट्रॉफी संघातून बाहेरचा मार्ग दाखवण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरविरुद्ध होणाऱ्या सीझनच्या पहिल्या सामन्यासाठी त्याचे नाव संघात नाही. सूर्यकुमारची उपलब्धता निश्चित न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
सूर्यकुमार जखमी नाही आणि श्रेयस अय्यरप्रमाणे लाल चेंडूच्या फॉरमॅटपासून विश्रांती घेत आहे, असंही नाही. हा निर्णय फक्त पहिल्या सामन्यासाठी घेतला गेला असून पुढील सामन्यांमध्ये तो मुंबईच्या संघात खेळेल, अशी अपेक्षा मुंबई क्रिकेट असोसिएशनने व्यक्त केली आहे. 35 वर्षीय सूर्यकुमारने मागील हंगामात तीन रणजी सामने खेळले होते, ज्यात त्याने 21.80 च्या सरासरीने 109 धावा केल्या होत्या.
“MCA ने हा संघ फक्त पहिल्या सामन्यासाठी निवडला आहे. सूर्यकुमार या सामन्यासाठी उपलब्ध नाही. त्याने कोणतीही दुखापतीचे किंवा अन्य कारणं सांगितलेली नाहीत. बहुधा ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी थोडा ब्रेक घ्यायचा असेल,” अशी माहिती एमसीएच्या एका अधिकाऱ्याने RevSportzला दिली.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या दौऱ्यात तीन वनडे आणि पाच टी20 सामने होतील. सूर्यकुमार यादव वनडे संघाचा भाग नाही, परंतु तो टी20 मालिकेत भारताचे नेतृत्व करणार आहे.
हे ही वाचा: BCCI अध्यक्ष मिथुन मन्हासला डेट करते वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती? Viral Photo मुळे खळबळ!
दरम्यान, 42 वेळा रणजी विजेते ठरलेले मुंबईचे रणजी मोहीम 2025-26 या हंगामासाठी 15 ऑक्टोबरपासून श्रीनगरमध्ये सुरू होणार आहे. संघ शनिवारी श्रीनगरकडे रवाना होणार आहे.
अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर संघाचे नेतृत्व शार्दुल ठाकूरकडे सोपवण्यात आले आहे. रहाणे मात्र खेळाडू म्हणून संघात कायम आहे. या सामन्यात सरफराज खान दुखापतीनंतर पुन्हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. शिवम दुबे देखील या संघात सामील आहे.
हे ही वाचा: ‘2-3 जणांनी मला थांबवलं...’, आर.अश्विनने केला निवृत्तीमागचा मोठा खुलासा! रोहित-गंभीरवरही बोलला
शार्दुल ठाकूर (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (विकेटकीपर), अजिंक्य रहाणे, सिद्धेश लाड, सरफराज खान, शिवम दुबे, शम्स मुलानी, तनुश कोटियन, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डिसूजा, हार्दिक तमोरे (विकेटकीपर), इरफान उमैर, मुशीर खान, अखिल हेरवाडकर, रॉयस्टन डायस.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.