2018 टी-20 महिला वर्ल्डकपची घोषणा
2018 मध्ये होणाऱ्या महिला वर्ल्डकपची घोषणा झाला आहे. 9 ते 24 नोव्हेंबर दरम्यान वर्ल्डकप होणार आहे.
नवी दिल्ली : 2018 मध्ये होणाऱ्या महिला वर्ल्डकपची घोषणा झाला आहे. 9 ते 24 नोव्हेंबर दरम्यान वर्ल्डकप होणार आहे.
वेस्टइंडिजच्या एंटीगा, बारबुडा, गयाना आणि सेंट लूसिया मध्ये हे सामने खेळले जाणार आहेत. वेस्टइंडिजने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत वर्ल्डकप जिंकला होता. आता त्यांच्याच देशात वर्ल्डकप होणार असल्याने ते पुन्हा विजयाच्या स्पर्धेत असतील.
आयसीसी टी-20 टीमची कर्णधार स्टेफनी टेलरकडेच वेस्टइंडिजचं कर्णधारपद असेल. क्रिकेट वेस्टइंडिजने या ठिकाणांची निवड बोली प्रक्रियेतून केली. यानंतर आयसीसीने याची घोषणा केली.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेविड रिचर्डसनने म्हटलं की, 'वेस्टइंडिजची टीम गेल्या वर्ल्डकपची चॅम्पियन आहे आणि मला यात कोणतीही शंका नाही की, ते पुन्हा चांगंली यजमान टीम ठरेल.'
वेस्टइंडिज व्यतिरिक्त वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूजीलंड, भारत, पाकिस्तान, दक्षिण अफ्रीका आणि श्रीलंका हे देश खेळणार आहेत. बांग्लादेश, नेदरलँड, आयरलँड, पापुआ न्यू गिनीय, स्कॉटलँड, थायलंड, युगांडा किंवा संयुक्त अरब अमीरात यामधील 2 टीम क्वालिफाय होतील. 3 ते 14 जुलैदरम्यान नेदरलँडमध्ये टी-20 क्वालीफाय सामने खेळले जाणार आहेत.
कॅरेबियन टीम 2007 वर्ल्डकप आणि 2010 टी-20 वर्ल्डकपची यजमान टीम होती.