सानिया मिर्झाने पाकिस्तानकडून टाळ्या वाजवल्या, आणि यानंतर जे काही झालं....

भारताची टेनिसपटू (Indian Tennis Player) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकची (Shoaib Malik Wife) पत्नी सानिया मिर्झा (Sania Mirza) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती.

Updated: Nov 12, 2021, 06:12 PM IST
सानिया मिर्झाने पाकिस्तानकडून टाळ्या वाजवल्या, आणि यानंतर जे काही झालं....  title=

दूबई | साखळी फेरीत पाचच्या पाच सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानचं (Pakistan) टी 20 वर्ल्ड कपमधील (T 20 World Cup 2021) आव्हान संपुष्टात आलं. ऑस्ट्रेलियाने (Australia) दुसऱ्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये धडक मारली.  

हा महत्त्वपूर्ण सामना पाहण्यासाठी भारताची टेनिसपटू (Indian Tennis Player) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकची (Shoaib Malik Wife) पत्नी सानिया मिर्झा (Sania Mirza) स्टेडियममध्ये उपस्थित होती. सामन्यादरम्यान सानिया मिर्झाने केलेल्या एका कृतीमुळे तिला ट्विटरवर ट्रोल केलं जात आहे. ( 20 world cup 2021 australia vs pakistan sania mirza troleed on twitter over to supporting for pakistan)

नक्की काय झालं?
  
ऑस्ट्रेलियाला स्टीव्ह स्मिथच्या रुपात तिसरा झटका बसला. शादाबा खानने स्मिथला फखर जमाच्या हाती कॅच आऊट केलं. स्मिथला आऊट केल्याने सानियाने स्टॅंडमध्ये उभं राहतं टाळ्या वाजवल्या. 

सानियाने टाळ्या वाजवल्याने तिला ट्रोल केलं जात आहे. सानियाच्या या कृतीवरुन तिचा पाकिस्तानला पाठिंबा आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. सानियाचा टाळ्या वाजवतानाचा फोटो व्हायरल होत आहे. 

सामन्याचा धावता आढावा

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानकडून सलामीवीर रिझवानने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली. तर फखर झमाने नाबाद 55 रन्स केल्या. या दोघांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पाकिस्तानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 176 धावांपर्यंत मजल मारली.

प्रत्युतरात दाखल ऑस्ट्रेलियाने हे विजयी आव्हान 1 ओव्हरआधी पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाकडून ओपनर डेव्हिड वॉ़र्नरने 49 धावा केल्या. तर निर्णायक क्षणी मार्क्स स्टोयनिस आणि मॅथ्यू वेड या दोघांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला.