T20 World Cup 2022 Namibia Vs Netherland: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमध्ये दोन उलटफेर पाहायला मिळाले. त्यामुळे श्रीलंका (Sri Lanka) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघाची सुपर 12 फेरीतील वाट बिकट झाली आहे. आता नेदरलँडनं नामिबियाला (Netherland Vs Namibia) पराभूत केल्यानं श्रीलंकेच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण पहिल्याच सामन्यात नामिबियानं श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत केलं. त्यामुळे श्रीलंकेची धावगती उणे 2.750 झाली आहे. गुणतालिकेत श्रीलंकन संघ तळाशी आहे. त्यामुळे सलग दोन विजयांसह श्रीलंकेला चांगली धावगती राखणं गरजेचं आहे. श्रीलंकेसाठी यूएई आणि नेदरलँडसोबतचा सामना करो या मरोचा असणार आहे. दुसरीकडे नेदरलँडनं ग्रुप स्टेजमध्ये सलग दोन विजय मिळवत सुपर 12 फेरीत स्थान निश्चित केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुणतालिका


संघ सामने  विजय  पराभव  धावगती  गुण
नेदरलँड  2 2 0 +0.149 4
नामिबिया  2 1 1  +1.277  2
यूएई  1 0 1 -0.097  0
श्रीलंका 1 0 1 -2.750 0


नेदरलँड विरुद्ध नामिबिया
नामिबियानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नामिबियानं 20 षटकात 6 गडी गमवून 121 धावा केल्या आणि नेदरलँडला विजयासाठी 122 धावांचं आव्हान दिलं. नामिबियानं दिलेलं आव्हान नेदरलँडनं 19.3 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. नेदरलँडने नामिबियावर 5 गडी आणि 3 चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह नेदरलँडचं सुपर 12 फेरीतील स्थान निश्चित झालं आहे.