Team India Probable XI vs New Zealand Final : टी 20 वर्ल्डकपचा अंतिम थरार रविवारी 8 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम रंगणार आहे. फायनलची लढत भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारताने टी 20 वर्ल्डकपमध्ये चौथ्यांदा धडक मारली आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांचा इतिहास पाहता हे दोन्ही संघ आतापर्यंत 30 वेळा एकमेकांशी लढले आहेत. या सामन्यांमध्ये भारताने 18 वेळा तर न्यूझीलंडने 11 वेळा विजय मिळाला आहे. एक सामना ‘टाय’ झाला होता. विशेष म्हणजे, 2022 पासून आतापर्यंत हे दोन्ही संघ 10 वेळा आमनेसामने आले होते. यात फक्त 2 वेळा कीवी संघाला विजय मिळवता आला. या विजयाच्या गणितावरुन भारताचे पारडे जड आहे. आता पुन्हा न्यूझीलंडला धुळ चारण्यासाठी भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.
जगातील नंबर वन टी-20 फलंदाज मानल्या जाणाऱ्या अभिषेक शर्मासाठी वर्ल्डकपमध्ये आपली जादू चालवता आली नाही. टी 20 वर्ल्डकपमधील 7 मॅचमध्ये अभिषेक फक्त 89 रन्स काढू शकला. सेमी फायनलमध्येही तो इंग्लंडविरुद्ध फक्त नऊ रन्स करु शकला. परिणामी, कर्णधार सूर्यकुमार यादव अंतिम सामन्यासारख्या महत्त्वाच्या सामन्यात फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूला खेळवण्याचा धोका घेणार नाही असं म्हणतात. जर अभिषेक बाहेर ठेवलं तर इशान किशन डावाची सुरुवात करेल अशी शक्यता आहे. इशानने या स्पर्धेत सलामीवीर म्हणून दोन शानदार अर्धशतके झळकावली तर संजू सॅमसनसह तो संघाला आक्रमक सुरुवात देण्यास सक्षम आहे .
दुसरीकडे अभिषेकची जागा घेण्यासाठी रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांची नावे शर्यतीत आहेत. पण कुलदीप यादवचा वरचष्मा असल्याचे तज्ज्ञ सांगतात. यामागे दोन मुख्य कारणे म्हणजे इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये भारताला सहाव्या तज्ज्ञ गोलंदाजाची कमतरता भासली. वरुण चक्रवर्ती (६४ धावा) आणि अर्शदीप सिंग यांच्या महागड्या गोलंदाजीमुळे चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत, कुलदीपसारखा विकेट घेणारा पर्याय संघाला बळकटी देईल अशा विश्वास आहे. इतिहास पाहता 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात किवीजविरुद्ध दोन विकेट घेऊन कुलदीपने भारताच्या विजयाचा पाया रचून दिला होता. मोठ्या सामन्यांमधील त्याचा अनुभव त्याला रिंकू किंवा सुंदरपेक्षा पुढे ठेवतो.
वरुण चक्रवर्ती हा टी-20 मध्ये नंबर 1 चा गोलंदाज मानला गेला तरी गेल्या सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला होता. अर्शदीपचा फॉर्म देखील व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. पण, अंतिम सामन्यासारख्या मोठ्या सामन्यात या दोघांना वगळण्याची शक्यता खूपच कमी मानली जात आहे.
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
GT
(20 ov) 210/4
|
VS |
DC
209/8(20 ov)
|
| Gujarat Titans beat Delhi Capitals by 1 run | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(20 ov) 163/7
|
VS |
SCO
151/9(20 ov)
|
| Oman beat Scotland by 12 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RR
(11 ov) 150/3
|
VS |
MI
123/9(11 ov)
|
| Rajasthan Royals beat Mumbai Indians by 27 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.