IND vs ENG Semi Final Umpire: T20 वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये कोण करणार अंपायरिंग? ICC कडून घोषणा; भारतीयांसाठी गुड न्यूज!

T20 World Cup 2026 India vs England Semi Final Umpire: पहिली सेमीफायनल 4 मार्चला कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. 

प्रविण दाभोळकर | Updated: Mar 4, 2026, 07:26 PM IST
IND vs ENG Semi Final Umpire: T20 वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये कोण करणार अंपायरिंग? ICC कडून घोषणा; भारतीयांसाठी गुड न्यूज!
टी 20 वर्ल्डकप सेमी फायनल

T20 World Cup 2026 India vs England Semi Final Umpire: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने टी-20 वर्ल्डकप 2026 च्या सेमीफायनल सामन्यांसाठी अधिकृत अंपायर आणि मॅच ऑफिशियल्सची यादी जाहीर केलीय. हे दोन्ही सेमीफायनल 4 आणि 5 मार्चला अनुक्रमे कोलकाता आणि मुंबई येथे खेळवले जाणार आहेत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड आणि भारत विरुद्ध इंग्लंड हे सामने असल्याने आयसीसीने अनुभवी अंपायरांची निवड केलीय. यात एका भारतीय अंपायरचाही समावेश आहे.

Add Zee News as a Preferred Source

पहिली सेमीफायनल

पहिली सेमीफायनल 4 मार्चला कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. एडेन मार्करामच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका आणि मिचेल सँटनरच्या न्यूझीलंड संघात टक्कर होईल. ऑन-फील्ड अंपायर म्हणून रिचर्ड इलिंगवर्थ आणि अॅलेक्स व्हार्फ काम पाहतील. नितिन मेनन तिसरे अंपायर, रॉड टकर चौथे अंपायर आणि मॅच रेफरी म्हणून माजी भारतीय वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ असतील. इलिंगवर्थ यांनी याआधी दक्षिण आफ्रिकेच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये अंपायरिंग केली होती, ज्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला.

Rule Change: भारतातील सर्वात मोठ्या खासगी बँकेने बदलला नियम, 1 एप्रिलपासून UPI वापरणाऱ्यांचं टेन्शन वाढणार...

दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत 

दक्षिण आफ्रिका या विश्वचषकात अजेय राहिला आहे. मार्करामच्या संघाने भारतालाही हरवून सेमीफायनलची चित्र बदलले. ते या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना हरले नाहीत. यामुळे ते फायनलसाठी प्रबळ दावेदार आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या ग्रुप स्टेजमध्येही त्यांनी मोठी विजय मिळवली होती. संघाची मजबूत फलंदाजी आणि गोलंदाजी यामुळे चाहत्यांना रोमांचक सामना दिसणार आहे.

न्यूझीलंडचे आव्हान

न्यूझीलंड संघासाठी हा सामना विशेष आहे. कारण टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात त्यांनी दक्षिण आफ्रिकेला कधीच हरवले नाहीय. या स्पर्धेतील ग्रुप राउंडमध्येही त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून मोठी हार पत्करावी लागली. तरीही सँटनरच्या नेतृत्वात ते फायनल गाठण्यासाठी प्रयत्न करतील. संघातील अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून राहून ते आश्चर्यकारक निकाल देऊ शकतात.

दुसरी सेमीफायनल

दुसरी सेमीफायनल 5 मार्चला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळवली जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडिया हॅरी ब्रूकच्या इंग्लंडशी भिडेल. ऑन-फील्ड अंपायर क्रिस गॅफने आणि अल्लाहुद्दीन पालेकर हे भारतीय अंपायर असतील. एड्रियन होल्डस्टॉक तिसरे अंपायर, पॉल रेफेल चौथे अंपायर आणि अँडी पायकॉफ्ट मॅच रेफरी असतील. गॅफने यांनी याआधी वेस्ट इंडीजमधील भारत-इंग्लंड सेमीफायनलमध्ये अंपायरिंग केली होती.

पालेकरांचा अनुभव

भारतीय अंपायर अल्लाहुद्दीन पालेकर यांना या सामन्यात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. या विश्वचषकात त्यांनी इंग्लंडच्या दोन सामन्यांसह भारत-नीदरलँड्स सामन्यात अंपायरिंग केलीय. त्यांचा अनुभव या हाय-प्रोफाइल सामन्यात निष्पक्ष निर्णय घेण्यास मदत करेल. यामुळे भारतीय चाहत्यांना नक्कीच अभिमान वाटेल.

भारत-इंग्लंडमध्ये टक्कर 

भारत आणि इंग्लंड हे सलग तिसऱ्या टी-20 विश्वचषक सेमीफायनलमध्ये आमनेसामने आहेत. 2022 मध्ये इंग्लंडने ॲडलेडमध्ये भारताला 10 विकेटने हरवले तर 2024 मध्ये भारतने जॉर्जटाउनमध्ये 63 धावांनी विजय मिळवला. आता मुंबईत फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही टीम लढतील. त्यामुळे हा सामना रंगतदार होईल. ज्यात दोन्ही टीमच्या ताकदीचा कस लागेल.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More