'भारत आज वर्ल्डकपबाहेर असता', पाकिस्तानी खेळाडू असं का म्हणाला? 12 वी ओव्हर मॅचनंतरही वादात

T20 World Cup 2026: भारत आणि वेस्ट इंडिजच्या सामन्यात 12 व्या ओव्हरमध्ये घडलेल्या प्रकारावरुन पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने अगदीच विचित्र दावा करताना भारत टी-20 2026 वर्ल्डकपमधून बाहेर पडला असता असं म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 2, 2026, 01:13 PM IST
'भारत आज वर्ल्डकपबाहेर असता', पाकिस्तानी खेळाडू असं का म्हणाला? 12 वी ओव्हर मॅचनंतरही वादात
जाहीर कार्यक्रमात पाकिस्तानी खेळाडूचा दावा (प्रातिनिधिक फोटो)

T20 World Cup 2026: भारताने टी-20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 8 च्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजवर विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. 5 विकेट्स आणि 4 बॉल शिल्लक ठेवत भारताने विजय मिळवला. भारत आणि वेस्ट इंडिजच्या या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरॉन हेटमायर बाद देण्यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. शिमरॉन हेटमायरला ज्या पद्धतीने बाद ठरवण्यात आलं त्यावरुन शंका उपस्थित केली जात आहे. खरं कर शिमरॉन हेटमायरने 11 बॉलमध्ये 27 धावा करुन हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्तीवर प्रतिहल्ला चढवला होता. आता शिमरॉन हेटमायर मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत असतानाच जसप्रीत बुमराहकडे चेंडू सोपवण्यात आला आणि त्याने अवघ्या तीन चेंडूंमध्ये शिमरॉन हेटमायरला तंबूत पाठवलं. मात्र ज्या पद्धतीने हेटमायर बाद झाला त्यावरुन नवीन वाद सुरु असून त्याला बाद ठरवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं मत अनेकांनी नोंदवलं असून यामध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अमिरनेही यावरुन अगदी भारत पराभूत झाला असता इथपर्यंतचं विधान केलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

नेमकं झालं काय?

12 व्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर बुमराहने टाकलेल्या अखूड टप्प्याच्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात शिमरॉन हेटमायरच्या बॅटची कड घेऊन चेंडू विकेटकीपर संजू सॅमसनच्या हातात विसावला. बुमराहने अपील केलं. त्यावर पंच ख्रिस ग्रार्फिने यांनी शिमरॉन हेटमायरला बाद असल्याचं बोट उंचावून सांगितलं. मात्र शिमरॉन हेटमायरने रिव्ह्यू घेतला असता अल्ट्राएजमध्ये चेंडू बॅटला लागल्याचं स्पष्ट झाल्यानंतरही शिमरॉन हेटमायर नाराज होता. 

नक्की वाचा >> T20 World Cup: भारताची Semi Final ची मॅच कोणाविरुद्ध? किती तारखेला? किती वाजता सुरु होणार मॅच?

पाकिस्तानी खेळाडू काय म्हणाला?

यावरुन बोलताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद आमीरने 'हारना मना है' नावाच्या कार्यक्रमामध्ये शिमरॉन हेटमायरला बाद ठरवण्याच्या निर्णयावरुन विधान केलं. शिमरॉन हेटमायर बाद नव्हता असा दावा आमीरने केला.  शिमरॉन हेटमायर अजून काही काळ खेळला असता तर भारत वर्ल्डकप 2026 च्या स्पर्धेतून बाहेर पडला असता असा विचित्र दावा आमीरने केला आहे. "मला शिमरॉन हेटमायरला बाद ठरवण्याचा निर्णय वादग्रस्त वाटला. मला वाटतं तो आऊट नव्हता. तो अजून काही काळ मैदानावर थांबला असता तर वेस्ट इंडिजचा स्कोअर 220-230 पर्यंत गेला असता आणि आज भारत वर्ल्डकप बाहेर असता," असंही आमीरने म्हटलं आहे. 

खरं तर मोहम्मद आमीरने भारत आणि वेस्ट इंडिज सामन्याआधी भारताऐवजी हा सामना वेस्ट इंडिज जिंकेल असं भाकित व्यक्त केलं होतं. वेस्ट इंडिज सेमीफायनलला पोहचेल असं मोहम्मद आमीर म्हणाला होता.

भारत फार वाईट क्रिकेट खेळत असल्याचा दावाही मोहम्मद आमीरने केला आहे. भारताची फिल्डींग आणि गोलंदाजी एवढ्या चांगल्या स्तराची नसल्याचं आमीरने म्हटलं.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More