अखेर ठरलं! 'या' अ‍ॅपवर पाहता येणार T20 World Cup 2026 चे सामने, ICC ने फॅन्सना दिली खुशखबर

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 फेब्रुवारी महिन्यात सुरु होणार आहे. तेव्हा त्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंगबाबत महत्वाचे अपडेट्स आयसीसीने शेअर केले आहेत.   

पूजा पवार | Updated: Dec 12, 2025, 09:59 PM IST
अखेर ठरलं! 'या' अ‍ॅपवर पाहता येणार T20 World Cup 2026 चे सामने, ICC ने फॅन्सना दिली खुशखबर
(Photo Credit : Social Media)

T20 World Cup 2026 : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 सुरु होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक आहेत. यंदा ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये खेळवली जाणार असून 7 फेब्रुवारीला या स्पर्धेला सुरुवात होईल. तर अहमदाबाद येथे स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली होती की मोठ्या रक्कमेची मागणी केल्याने जियोस्टारने टी20 वर्ल्ड कप 2026 ची (T20 World Cup 2026) लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यास नकार दिला आहे. ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. आता आयसीसीने सुद्धा या मुद्द्यावर प्रेस रिलीज जाहीर केली असून यात सांगण्यात आलंय की प्रेक्षक आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 चे सामने मोबाईलवर कोणत्या अ‍ॅपवर पाहू शकतात. 

Add Zee News as a Preferred Source

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल आणि जिओस्टारने मागील काही दिवसांपासून समोर येत असलेल्या रिपोर्ट्सला पूर्णविराम लावला असून याप्रकरणी त्यांनी संयुक्त स्टेटमेंट जाहीर केले आहेत. आयसीसी आणि जिओस्टारने त्यांच्या मीडिया भागीदारीच्या स्थितीबद्दलच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. आयसीसी आणि जिओस्टारने स्पष्ट केले की त्यांचा विद्यमान करार पूर्णपणे प्रभावी राहील आणि जिओस्टारकडेच भारतात आयसीसीच्या प्रसारणाचे अधिकृत मीडिया हक्क असतील. 

आयसीसीने काय म्हटले?

आयसीसीने मीडिया रिलीजमध्ये लिहिले की, 'आयसीसी आणि जिओस्टारने भारतातील आयसीसीच्या मीडिया हक्क करारांच्या स्थितीबाबत अलिकडच्या मीडिया रिपोर्ट्सची नोंद घेतली आहे. हे रिपोर्ट्स कोणत्याही संघटनेची भूमिका प्रतिबिंबित करत नाहीत. आयसीसी आणि जिओस्टारमधील विद्यमान करार पूर्णपणे लागू आणि प्रभावी राहील आणि जिओस्टार भारतात आयसीसीचा अधिकृत मीडिया राईट्स पार्टनर राहील. जिओस्टारने या करारातून माघार घेतली आहे असे म्हणणे चुकीचे आहे'.

वर्ल्ड क्लास कव्हरेजवर लक्ष : 

आयसीसीने रिलीजमध्ये पुढे म्हटले की, 'जिओस्टार त्यांच्या कराराच्या अटी पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. दोन्ही संस्था भारतातील चाहत्यांना आगामी आयसीसी स्पर्धांचे अखंड, जागतिक दर्जाचे कव्हरेज प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करतात. आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कपसह, हा खेळातील सर्वात प्रलंबीत जागतिक स्पर्धांपैकी एक आहे. या कार्यक्रमांची तयारी नियोजनाप्रमाणेच सुरू आहे आणि प्रेक्षक, जाहिरातदार किंवा उद्योग भागीदारांवर कोणताही परिणाम होत नाही. आयसीसी आणि जिओस्टार, दीर्घकालीन व्यावसायिक भागीदार म्हणून, ऑपरेशनल, कमर्शियल आणि स्ट्रॅटेजिक बाबींवर नियमित चर्चा करतात, खेळाच्या वाढीमध्ये ही भागीदारी काय भूमिका बजावू शकते यावर लक्ष केंद्रित करतात.

FAQ :

आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२६ कधी सुरू होणार आहे?
उत्तर: आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२६ ही स्पर्धा ७ फेब्रुवारीला सुरू होईल.

आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२६ कोणत्या देशांमध्ये खेळवली जाणार आहे?
उत्तर: ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये खेळवली जाणार आहे.

आयसीसी आणि जियोस्टारने या अफवांबाबत काय म्हटले आहे?
उत्तर: आयसीसी आणि जियोस्टारने संयुक्त स्टेटमेंट जाहीर करून मीडिया रिपोर्ट्सच्या अफवा फेटाळून लावल्या असून, त्यांचा विद्यमान करार पूर्णपणे प्रभावी राहील आणि जियोस्टार भारतात आयसीसीच्या प्रसारणाचे अधिकृत मीडिया हक्क धारक राहील.

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More