श्रीलंकेने विजयासहीत सुपर 8 मध्ये स्थान निश्चित केलं आहे. आता माजी विजेत्या संघाला वर्ल्डकपमध्ये टिकून राहण्यासाठी झिम्बाव्वेवर अवलंबून रहावं लागणार आहे. झिम्बावेचा पुढला सामना आयर्लंडविरुद्ध मंगळवारी होणार असून हा सामना झिम्बाबवेने जिंकला तर ते सुपर एटसाठी पात्र ठरतील आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर पडेल. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला आठ विकेट्सने हरवले. सोमवारी पल्लेकेले येथे 2026 च्या टी-20 विश्वचषकातील 30 वा सामना खेळवण्यात आला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने मिशेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या अर्धशतकांच्या मदतीने 20 षटकांत 10 विकेट्सच्या मोबदल्यात 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 18 षटकांत 2 विकेट्सच्या मोबदल्यात 184 धावा केल्या आणि सामना जिंकला. त्यांच्याकडून पथुम निस्सांकाने शानदार शतक झळकावले.
स्टोइनिसने श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. त्याने कुसल मेंडिसला कोनोलीने झेलबाद केले, जो 51 धावा काढून बाद झाला. पवन रथनायके आता पथुम निस्सांकासोबत खेळत आहे. पथुम निस्सांका 32 चेंडूत आणि कुसल मेंडिस 35 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत आहे. या दोघांनी आता दुसऱ्या विकेटसाठी 97 धावा जोडल्या आहेत. 12 षटकांनंतर धावसंख्या एक बाद 104 आहे.
पॉवरप्लेमध्ये श्रीलंकेने एका विकेटच्या मोबदल्यात ६१ धावा केल्या. पथुम निस्सांका ३८ धावांसह आणि कुसल मेंडिस 20 धावांसह क्रिजवर आहेत. त्याआधी, कुसल परेरा एक धाव घेत बाद झाला. श्रीलंकेची सुरुवात डळमळीत झाली. स्टोइनिसने कुसल परेराला बाद केले. तो फक्त एक धाव करू शकला. आता पथुम निस्सांका आणि कुसल मेंडिस क्रीजवर आहेत.
ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेसाठी 182 धावांचे लक्ष्य ठेवले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 10 विकेटच्या मोबदल्यात 181 धावा केल्या. त्यांच्याकडून मिशेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडने अर्धशतके झळकावली. दरम्यान, श्रीलंकेकडून दुष्मंथा चामीरा यांनी तीन तर दुष्मंथा चामीरा यांनी दोन विकेट घेतल्या.
वेस्ट इंडीज - सर्वात आधी सुपर 8 साठी पात्र ठरलेला संघ. नेपाळवर मोठ्या विजयानंतर ठरला पात्र
भारत - पाकिस्तानवर 61 रनने विजय मिळवून विद्यमान विजेता संघ सुपर 8 मध्ये पोहोचला आहे.
दक्षिण आफ्रिका - अफगाणिस्तानने संयुक्त अरब अमिरातीवर विजय मिळल्यामुळे दक्षिण आफ्रिका सुपर 8 साठी पात्र ठरली.
इंग्लंडच्या संघाने इटलीवर निसटता विजय मिळवत आपलं सुपर 8 मधील स्थान निश्चित केलं.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
SA
(20 ov) 169/8
|
VS |
NZ
173/1(12.5 ov)
|
| New Zealand beat South Africa by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
WI
(20 ov) 195/4
|
VS |
IND
199/5(19.2 ov)
|
| India beat West Indies by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ZIM
(20 ov) 153/7
|
VS |
SA
154/5(17.5 ov)
|
| South Africa beat Zimbabwe by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.