T20 World Cup 2026 Sanju Samson Rohit Sharma Video: भारतीय संघाला टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहचवणाऱ्या सलामीवीर संजू सॅमसनने मोलाचं योगदान दिलं. नाबाद 97 धावा करताना 196 चं लक्ष्य पूर्ण करण्यात सर्वात मोठा वाटा संजूनेच उचलला. खरं तर संपूर्ण टी-20 वर्ल्डकपमध्ये संजूचा हा या पर्वातील तिसराच सामना होता. एवढ्या मोठ्या मंचावर संजूला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या 'करो या मरो'च्या सामन्यात संजूने संयमाने डावाला आकार देत भारताला विजय मिळवून दिला. संजूला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मात्र या विजयानंतर रोहित शर्माचा संजूसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आयसीसीनेही शेअर केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून, संजू सॅमसनच्या पदरी सातत्याने अपयश येतो. संजूला आक्रमक सुरुवात केल्यानंतर त्याचं मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता येत नव्हतं. त्यामुळेच त्याच्या कौशल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. परंतु रविवारी झालेल्या सुपर 8 मधील शेवटच्या सामन्यात आपलं कौशल्य दाखवून दिलं. एका बाजूला विकेट पडत असताना दुसरीकडे संजूने धावगती नियंत्रित ठेवत स्वत:वर आणि संघावरही फार दबाव येऊ दिला नाही. खरं तर संजूच्या नावावर टी-20 मध्ये तीन शतकं असली तरी ही खेळी शतकी खेळीपेक्षाही खास होती असं स्वत: संजू सामन्यानंतर म्हणाला.
टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीला संजू सॅमसन भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. अभिषेक शर्मा आणि इशान किशनला सलामीची जोडी म्हणून संघ व्यवस्थापनाकडून पसंती देण्यात आली होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दारुण पराभवानंतर, संघ व्यवस्थापनाने आपली रणनीती बदलली. विशेषतः डावखुऱ्या फलंदाजांमुळे वरच्या फळीतील संतुलन बिघडत असल्याचं लक्षात आल्याने संजूला संघात स्थान देण्यात आले. त्याला अभिषेकसोबत सलामीला पाठवण्यात आले. संजूला संघात स्थान दिल्याने इशानला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात तर संजूने त्याची निवड योग्य का आहे हे सिद्ध करुन दाखवलं. टी-20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु झाली तेव्हा भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माशी संजूने केलेल्या चर्चेचा व्हिडिओ सोशल मीडियावर भारत सेमीफायनलमध्ये पोहचल्यानंतर व्हायरल झाला. साखळी फेरीतील अमेरिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी मैदानावर दोघांची भेट झाली, जिथे रोहितने संजूला धीर दिला होता. यादरम्यान, रोहितने संजूला प्रोत्साहन देण्यासाठी, "कसा आहेस? दुःखी होऊ नकोस भावा. ही फार दिर्घकाळ चालणारी स्पर्धा आहे; तुला कधीही संधी मिळू शकते," असं म्हटलं होतं. आता रोहितने संजूवर व्यक्त केलेला हाच विश्वास त्याने खरा करुन दाखवल्याची चर्चा इंटरनेटवर रंगली आहे. संजूला रोहितने पहिल्या सामन्याच्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारी रोजी हा सल्ला दिल्यानंतर बरोबर 23 दिवसांनी संजूने भारताला दमदार खेळी करत सेमीफायनलमध्ये पोहोचवलं.
भारताचा पुढचा सामना 5 तारखेला इंग्लंडविरुद्ध होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणारा सेमीफायनलच्या या सामन्यात जिंकणारा संघ 8 मार्च रोजी अहमदाबादच्या स्टेडियमवर फायनल खेळणार आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
WI
(20 ov) 195/4
|
VS |
IND
199/5(19.2 ov)
|
| India beat West Indies by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ZIM
(20 ov) 153/7
|
VS |
SA
154/5(17.5 ov)
|
| South Africa beat Zimbabwe by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
PAK
(20 ov) 212/8
|
VS |
SL
207/6(20 ov)
|
| Pakistan beat Sri Lanka by 5 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.