'आमच्या संघात वसीम अक्रम, शोएब अख्तर असते तरी आम्ही हारलो असतो', पाकिस्तानी खेळाडू संतापला

Rashid Latif blames Salman Ali Agha and the coaching staff for T20WC Exit: श्रीलंकेविरोधातील सामना जिंकल्यानंतरही पाकिस्तान संघ टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. यानंतर त्यांच्या देशातून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 3, 2026, 05:10 PM IST
'आमच्या संघात वसीम अक्रम, शोएब अख्तर असते तरी आम्ही हारलो असतो', पाकिस्तानी खेळाडू संतापला

Rashid Latif blames Salman Ali Agha and the coaching staff for T20WC Exit: पाकिस्तान क्रिकेट संधआचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज रशीद लतीफने टी-20 वर्ल्डकपमधील अपयशासाठी कर्णधार सलमान अली आगा आणि कोचिंग स्टाफला जबाबदार धरलं आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव केल्यानंतरही स्पर्धेतून बाहेर पडला. प्रथम फलंदाजी करताना 213 धावांचं आव्हान दिल्यानंतर, पाकिस्तानला नेट रन रेटमध्ये न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी श्रीलंकेला 147 पेक्षा कमी धावांवर रोखणं आवश्यक होते. जर त्यांनी ही कामगिरी केली असती तर सेमी-फायनलमध्ये दाखल झाले असते. श्रीलंकेच्या कर्णधाराच्या 31 चेंडूत नाबाद 76 धावांच्या खेळीमुळे त्यांच्या संघाला 207 पर्यंत मजल मारता आली.

Add Zee News as a Preferred Source

रशीद लतीफने सलमानला खेळाविषयीच्या त्याच्या कमी जाणीवेबद्दल खडेबोल सुनावले आहेत. लतीफने म्हटलं की, त्याच्यासारख्या कर्णधाराकडे वसीम अक्रम आणि वकार युनूससारखे दिग्गज खेळाडू असते तरी त्याने सामना गमावला असता.

"फलंदाजी ही आमची समस्या आह. आमचे सर्व महत्त्वाचे गोलंदाज खेळले आणि तरीही त्यांनी 200 हून अधिक धावा दिल्या. जर तुम्ही वसीम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर, सकलेन मुश्ताक, मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्नसारखे खेळाडू या कर्णधाराला दिले तरी तो हातातील सामना गमावेल," असं लतीफने 'हारना मन है' कार्यक्रमात सांगितलं.

'अरे याला संघात जागा मिळत नाही, कर्णधार कोणी केलं?,' शाहिद आफ्रीदीचा संताप; जावई शाहीनलाही सुनावले खडेबोल

 

"तुमच्याकडे कोणते गोलंदाज नव्हते? अबरार अहमद, उस्मान तारिक आणि शादाब खानसारखे गोलंदाज होते. शादाब खान 15 व्या षटकात गोलंदाजी करायला आला. तुमच्याकडे मोहम्मद नवाज आणि नसीम शाह देखील होते. फक्त एकालाच बाहेर ठेवण्यात आला, तो म्हणजे सईम अयुब. यामध्ये दोष कर्णधाराचा आहे, त्याच्या खेळाच्या जाणिवेचा आहे," असं लतीफ म्हणाला.

सलमानने अखेरच्या ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाज नसीम शाहसाठी एकही षटक राखून न ठेवल्याबद्दल टीका केली. त्याने फिरकीपटूंचा आधीच वापर करायला होता असं मत त्याने व्यक्त केलं. 

संजू सॅमसनच्या मॅचविनिंग 97 धावांच्या खेळीवर पाकिस्तानात नेमकी काय चर्चा होतेय? दिग्गज खेळाडू भारावले

 

"तुम्ही सुरुवातीच्या 4 ओव्हर्स वेगवान गोलंदाजाला दिल्या. तुम्ही नसीम शाहच्या ओव्हर बॅकअप म्हणून ठेवला. अबरारने आधी गोलंदाजी करायची होती. त्याने पाचव्या ओव्हरमध्ये विकेट घेतली. मी समजू शकतो की, फलंदाज शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त धावा करु शकले नाहीत. पण तुमच्याकडे 200 पेक्षा जास्त धावा होत्या. गोलंदाजीने तुम्हाला हरवलं आणि स्पर्धेतून बाहेर काढलं," अशी टीका त्याने केली.

त्याने मुख्य प्रशिक्षक माइक हेसन आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफवर फलंदाजी क्रमात जास्त प्रयोग केल्याबद्दल आरोप केला. "फलंदाजी हा मुद्दा नव्हता कारण या दोघांनी उत्तम फलंदाजी केली. पण त्यानंतर, संघ व्यवस्थापनाने पुन्हा एकदा फलंदाजी क्रम बदलला. तुम्ही म्हणता, 'नाफे, तू जा; शादाब, तू जा आणि फलंदाजी कर.' हे प्रशिक्षक पराभवाचे कारण आहेत," असं लतीफ म्हणाला.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More