Tamim Iqbal Heart Attack: क्रिकेट जगतातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालला क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आलाय. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तमीम ढाका प्रीमियर डिव्हिजन लीगसाठी सामना खेळत होता. मिळालेल्या अहवालांनुसार तो सध्या धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येतय.
तमीम इक्बालच्या छातीत दुखत होतं होतं. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे तमीमची ईसीजी चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये त्यांना हृदयविकाराचा मोठा झटका आल्याचे निष्पन्न झालंय. क्रिकबझने यासंदर्भात वृत्त दिलंय.
तमीम इक्बालला सध्या ढाक्यातील फजिलातुन्नेस रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जिथे डॉक्टर त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. मोहम्मद स्पोर्टिंग क्लब विरुद्ध शाईनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात तमीम मोहम्मद स्पोर्टिंगकडून खेळत होता.
तमीम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतलीय. आता तो फक्त लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसतो. त्याने बांगलादेशसाठी 70 कसोटी, 243 एकदिवसीय आणि 78 टी-20 सामने खेळले आहेत.
तमीम इक्बालने कसोटीत 5134 आणि एकदिवसीय सामन्यात 8357 धावा केल्या आहेत. तमिमने टी-20 क्रिकेटमध्ये 1758 धावा केल्या आहेत.