तमीम इकबालचा ऑपरेशन थिएटरमधला धक्कादायक Video Viral, सामन्यादरम्यान मैदानात आला होता हृदयविकाराचा झटका

Tamim Iqbal Suffers Heart Attack:  डीपीएल सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तमीम इक्बालला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहे. उपचारादरम्यानचा रुग्णालयातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

तेजश्री गायकवाड | Updated: Mar 25, 2025, 08:32 AM IST
तमीम इकबालचा ऑपरेशन थिएटरमधला धक्कादायक Video Viral, सामन्यादरम्यान मैदानात आला होता हृदयविकाराचा झटका
Tamim Iqbal Suffers Heart Attack

बांगलादेशचा माजी एकदिवसीय क्रिकेट कर्णधार तमीम इक्बालला सोमवारी सामन्यात मैदानावरच हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी त्याला त्वरित  रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब आणि शाइनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यात खेळल्या जात असलेल्या 50 षटकांच्या सामन्याच्या पहिल्या डावात 36 वर्षीय तमीमने दुखत असल्याची तक्रार केली. त्यावेळी त्याला मैदानावर प्राथमिक उपचारानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.

रुग्णालयातील व्हिडीओ व्हायरल 

तमीम इक्बाल हा सामन्यात मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबचा कर्णधार होता आणि फक्त एक षटक फिल्डिंग केल्यानंतर त्याला त्रास सुरु झाला. लगेच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तमीम इक्बालची तिथे शस्त्रक्रिया झाली. आता त्याचा उपचारादरम्यानचा रुग्णालयातील व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

येथे वाचा सविस्तर: धक्कादायक! लाईव्ह सामन्यादरम्यान क्रिकेटरला आला हृदयविकाराचा झटका, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

 

काय म्हणाले डॉक्टर? 

उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी अधिकृत वैद्यकीय बुलेटिन जारी करत  सांगितले की, 'तमिम गंभीर अवस्थेत आमच्यापर्यंत पोहोचला. याला आपण हृदयविकाराचा झटका म्हणू शकतो. ब्लॉकेज काढण्यासाठी आम्ही अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी केली. वैद्यकीय प्रक्रिया यशस्वी झाली. बीकेएसपी आणि रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी यांच्यातील समन्वयामुळे तमीमवर तातडीने उपचार होऊ शकले.' सामनाधिकारी देबब्रत पॉल यांनी सांगितले की, "सुरुवातीला, तमीमला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती, परंतु त्याला सावर येथील बीकेएसपी मैदानावरून आणता आले नाही. नंतर त्याला फाजिलतुन्नेस रुग्णालयात नेण्यात आले." अहवालानुसार, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तमीमच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय बुलेटिनही जारी केले.

हे ही वाचा: इरफान पठाणचा IPL च्या कॉमेंट्री पॅनलमधून पत्ता कट, धक्कादायक कारण आले समोर

 

संघाचे अधिकारी तारिकुल इस्लाम यांनी एएफपीला सांगितले की तमीमवर ढाक्याच्या बाहेरील सावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि बांगलादेशी जनतेला त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. तमीम अचानक आजारी पडल्यानंतर, बीसीबीने त्यादिवशी नियोजित बोर्डाची बैठक रद्द केली आणि बोर्डाचे अनेक सदस्य त्याला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले.

नक्की काय झालं? 

तमिम इक्बाल ढाका प्रीमियर लीग 2025 दरम्यान हृदयविकाराचा झटका आला. मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यात सामना खेळला जात होता. हा सामना खेळत असताना त्याला मैदानावर छातीत तीव्र वेदना जाणवत होत्या. तिथे उपलब्ध असलेल्या क्टर आणि फिजिओने लगेच त्याची प्राथमिक तपासणी केली. यानंतर त्रास जास्त असल्याने तमीम इक्बालला फजिलातुनेसा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून ईसीजीसाठी पाठवले. तिथून तमिम पुन्हा स्टेडियममध्ये जात असताना पुन्हा त्रास जाणवला. 

हे ही वाचा: वडील ऑटो ड्रायव्हर, ना देशांतर्गत खेळण्याचा अनुभव; IPL मध्ये पदार्पण करणारा MI चा विघ्नेश पुथूर आहे तरी कोण?

 

पुन्हा मैदानात जाताना 

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे मुख्य डॉक्टर देबाशीष चौधरी म्हणाले, "पहिल्या रक्त तपासणीत डॉक्टरांना काही समस्या दिसल्या. तमीमला अस्वस्थ वाटत होते आणि त्याला ढाकाला परत जायचे होते. रुग्णवाहिका बोलावून त्याला स्टेडियममध्ये नेण्यात आले. पण वाटेत त्यांना पुन्हा छातीत दुखू लागले. यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात आणावे लागले. तेव्हा त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे आढळून आले."