Rohit Sharma Video: भारतीय क्रिकेट संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद मिळवून दिल्यानंतर Team India चा कर्णधार रोहित शर्मानं लगेचच त्याचं संपूर्ण लक्ष कुटुंबाकडे वळवलं. क्रिकेट सामन्यांमुळं सातत्यानं कुटुंबापासून दूर असणाऱ्या रोहितनं नुकतंच मालदीव बेटांवर जात तिथं काही निवांत क्षण व्यतीत केले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून (Hitman) हिटमॅननं काही फोटोही शेअर केले. जिथं सुट्टीच्या या दिवसांमध्ये त्यानं नेमका कसा काळ व्यतीत केला याची सुरेख अशी झलक पाहायला मिळाली. आता रोहित आणि त्याचं कुटुंब Vacation वरून परतलं असून विमानतळावरच त्यांची गाठभेट पापाराझींशी झाली.
रोहित आणि त्याच्या कुटुंबाची एक झलक टीपण्यासाठी तिथं छायाचित्रकारांचा आणि माध्यमांच्या प्रतिनिधींचा इतका गराडा असेल याची रोहितलाही बहुधा कल्पना नसावी. त्याचमुळं तो जेव्हा विमानतळावरून लेकीला घेऊन रोहित बाहेर आला तेव्हा ही गर्दी पाहताना त्याच्या चेहऱ्याचे तालरंग क्षणात बदलले.
काहीही न बोलताच त्यानं मुलीला कारमध्ये बसवत कारचं दार बंद केलं आणि त्यानं फक्त छायाचित्रकारांकडे एक कटाक्ष टाकला. तो काहीच बोलला नाही पण, चेहऱ्यावरील हावभाव मात्र बरंच बोलून गेल्याचं इथं पाहायला मिळालं. यानंतर क्षणातच त्यानं हा राग बाजूला सारत माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींचं लक्ष कुटुंब बसलेल्या कारकडून स्वत:कडे वळवलं आणि त्यांच्यासमोर फोटोंसाठी तो पोझ देताना दिसला. सोशल मीडियावर या वेळचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आणि रोहित नेमका का रागवला, हे पाहण्यासाठी अनेकांनीच हा व्हिडीओ वारंवार पाहिला.
सूत्रांच्या माहितीनुसार रोहित शर्मा पुढील काही दिवसांमध्ये आयपीएलच्या यंदाच्या पर्वासाठी मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत खेळताना दिसेल. 23 मार्च रोजी मुंबईच्या संघाचा पहिला सामना पार पडणार आहे, जिथं संघ चेन्नईच्या संघाला आव्हान देताना दिसेल. यंदाच्या वर्षीसुद्धा मुंबईच्या संघाचं नेतृत्त्वं हार्दिक पांड्या करणार असून, यावेळी संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.