Team India : टीम इंडियासाठी खेळलेल्या क्रिकेटरच्या मुलाचीही संघात निवड, पण....
टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या माजी स्टार खेळाडूच्या मुलाचीही संघात निवड, पाहा कोण आहे तो?
मुंबई : टीम इंडियाने (Team india) 2007 साली पहिलाच टी20 वर्ल्डकप जिंकला होता. या वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या माजी भारतीय क्रिकेटरच्या मुलाची आता थेट इंग्लंड संघात निवड झाली आहे. त्यामुळे आता क्रिकेट वर्तुळात या भारतीय बाप बेट्याच्या जोडीची चर्चा रंगलीय. (team india fromer crickter r p singh son harry slected for under 19 england cricket team)
टीम इंडियाचा (Team india) माजी फास्टर बॉलर आरपी सिंहचा (Rp singh) मुलगा हॅरीची टीममध्ये निवड करण्यात आली आहे. आरपी सिंहने (Rp singh) एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत याबाबतची माहिती दिली आहे. हॅरीची (Harry singh) इंग्लंड अंडर 19 संघात निवड करण्यात आली आहे. इंग्लंड श्रीलंका अंडर-19 विरुद्ध खेळणार आहे. हॅरी 18 वर्षाचा आहे. तो आपल्या कुटुंबासह इंग्लंडमध्ये राहतो.
आरपी काय म्हणाला?
"लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या सामन्यानंतर हॅरीची निवड करण्यात आली आहे. डर्बीविरुद्धच्या सामन्यात हॅरीने दमदार कामगिरी केली होती. त्याने या सामन्यात 150 धावा केल्या होत्या. याआधी अंडर-18 च्या सामन्यात हॅरीने 130 धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता. हॅरी हा एक चांगला फुटबॉलपटूही आहे", असंही आरपीने सांगितलं.
आरपी सिंहची टी 20 वर्ल्ड कप 2007 मधील निर्णायक कामगिरी
आरपी सिंहने टी 20 वर्ल्ड कप 2007 मधील निर्णायक कामगिरी केली होती. टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. आरपीने पाकिस्तान विरुद्धच्या अंतिम सामन्यात 3 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच आरपी त्या स्पर्धेत टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.
क्रिकेटमध्ये आतापर्यंत बाप लेकाच्या अनेक जोड्या आल्या, आपलं नशिब आजमावलं. त्यातील काही यशस्वी ठरले तर, काही अपयशी. मात्र आता आरपीचा मुलगा हॅरी आपल्या बापापेक्षा धमाकेदार कामगिरी करणार का, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
भारतीय क्रिकेटमधील आतापर्यंतच्या बाप-लेकाच्या जोड्या
रॉजर आणि स्टुअर्ट बिन्नी, सुनील आणि रोहन गावसकर, योगराज आणि युवराज सिंह, सचिन आणि अर्जुन तेंडूलकर हे बाप बेटे आतापर्यंत क्रिकेट खेळले आहेत. आता यामध्ये आरपी आणि हॅरी सिंहची वाढ झाली आहे.