)
IND VS ENG : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात महिला वर्ल्ड कप 2025 चा 20 वा सामना पार पडला. या सामन्यात भारताच्या महिला संघाला इंग्लंडकडून अवघ्या 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हा टीम इंडियाच्या महिला संघाचा वर्ल्ड कप 2025 मधील सलग तिसरा पराभव ठरल्यामुळे सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचं त्यांचं समीकरण अवघड होणार आहे. रविवार 19 ऑक्टोबर रोजी सकाळी टीम इंडियाच्या पुरुष संघाला सुद्धा पाहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 7 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. ज्यामुळे आता एकाच दिवसात टीम इंडियाला डबल धक्का बसला आहे.
इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात रविवारी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघाला आधी गोलंदाजीसाठी यावं लागलं. इंग्लंडने फलंदाजी करताना 284 धावा केल्या, तर भारताने त्यांच्या 6 विकेट घेतल्या. हेदर नाइटने इंग्लंडकडून शतक ठोकलं. एमी जोन्सने 56, नॅट सायव्हर-ब्रंटने 38 आणि टॅमी ब्यूमॉन्टने 22 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांपैकी दीप्ती शर्माने 4, श्रीचरणीने 2 विकेट घेतल्या. टीम इंडियाला विजयासाठी 285 धावांचं आव्हान मिळालं.
टीम इंडियाला विजयासाठी 285 धावांचं आव्हान असताना भारताकडून स्मृती मंधानाने सर्वाधिक 88, हरमनप्रीत कौरने 70, दीप्ती शर्माने 50, हरलीन देओलने 24 धावा केल्या. यादरम्यान टीम इंडियाने 6 विकेट सुद्धा गमावल्या. विजयासाठी अवघ्या 4 धावांची आवश्यकता असताना टीम इंडियाचा पराभव झाला. यापूर्वी महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला होता.
इंग्लंडच्या प्रमुख फलंदाजांची कामगिरी काय राहिली?
उत्तर: हेदर नाइट (शतक), एमी जोन्स (५६ धावा), नॅट सायव्हर-ब्रंट (३८ धावा) आणि टॅमी ब्यूमॉन्ट (२२ धावा) यांनी इंग्लंडसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
भारताला विजयासाठी काय आव्हान होते आणि त्यांनी किती धावा केल्या?
उत्तर: भारताला २८५ धावांचे आव्हान मिळाले. त्यांनी ५० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून २८० धावा केल्या, ज्यामुळे ४ धावांनी पराभव झाला.
हा पराभव टीम इंडियाकरता वर्ल्ड कपसाठी कसा महत्त्वाचा आहे?
उत्तर: हा भारताच्या महिलांसाठी वर्ल्ड कप २०२५ मधील सलग तिसरा पराभव आहे (यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेविरुद्ध). यामुळे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे समीकरण अवघड झाले आहे.